इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव व बाभूळगाव परिसरात विकासकामांसाठी निधी उपलब्ध व्हावा-वसंतरावआरडे
इंदापूर :तालुक्यातील हिंगणगाव व बाभूळगाव परिसरात विकासकामांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून दत्तात्रय भरणे राज्यमंत्री, वन मत्स्य व दुग्ध , महाराष्ट्र राज्य, व पालक मंत्री, सोलापूर जिल्हा. यांना श्री.वसंतराव आरडे सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले ,या मध्ये प्रामुख्याने हिंगणगांव, ता. इंदापूर येथे खालील विकास कामे होणे आवश्यक आसल्याचे आरडे म्हणाले या मध्ये चोरमलेवस्ती ते वसंत आरडेवस्ती डांबरीकरण १०लाख रूपये , हिंगणगांव-बाभूळगांव शिव (सरडेवाही हद्द) १०.लाख रुपये, डांबरीकरण चोरमलेवस्ती हनुमान मंदीर सभामंडप ५.लाख रुपये, आसबेवस्ती सभामंडप ५.लाख रुपये , आशी मागणी वसंतराव आरडे सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुणे जिल्हा यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कडे केल्यामुळे या भागाला निधी उपलब्ध करून दिल्यावर या भागाचा विकास होणार आसल्याची माहीती वसंतराव आरडे यांनी पत्रकारां समवेत चर्चा करताना दिली
टिप्पण्या