इंदापूर:तालुक्यातील जनसामान्यांचे नेतृत्व काटी वडापुरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले यांनी अरूण जगताप यांचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे त्यांच्या घरी जावून कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यांचे मृत्यूसमयी वय ६५ वर्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत वडीलांच्या अचानक झालेल्या निधनामुळे या कुटुंबाच्या दुःखाला पारावार उरला नाही . या छोट्या कुटुंबातील कर्ता पुरुष जाण्यामुळे संसार मोडून पडला आहे .कधीही न भरून येणारे दुःख या कुटुंबाच्या वाट्याला आले आहे. त्यांच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे. परमेश्वराकडे इतकीच प्रार्थना की, हे दुःख सावरण्यासाठी शक्ती आणि आशीर्वाद त्यांने आपणाला द्यावेत. या पवित्र आत्म्यास चिर शांती द्यावी!अशी प्रार्थना करून मा. अभिजीत तांबिले यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या