आम्ही 'बि' घडलो आणि पत्रकारिते समोरील आव्हाने हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
इंदापूर:२६ जानेवारी च्या दिवशी पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रम घेऊन स्वातंत्र्य, समता, न्याय,बंधुता याचे दर्शन महेश स्वामी यांनी सर्वांना घडवले, विषय आम्ही 'बि' घडलो... आणि पत्रकारिते समोरील आव्हाने या विषयावर प्रत्येक पत्रकारांना आपापले विचार व्यक्त करण्याची नामी संधी दिली,
हा कार्यक्रम जेष्ठ पत्रकार महेश स्वामी यांच्या संकल्पनेतून राधिका रेसिडेन्सी क्लब, इंदापूर येथे साजरा करण्यात आला,यावेळी बोलताना जेष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर म्हणाले की,
लोक आता प्रिंट माध्यमांकडून ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळत असल्याचं दिसून येत आहे.माध्यमांमधले हे बदल सांगत असताना आता पत्रकारितेतलं भविष्य हे डिजिटल असल्याचंही म्हणावे लागत आहे.सुरुवातीला प्रिंट माध्यमांसमोर इलेक्ट्रॉनिक मीडिया आव्हान होतं.
पण इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आगमनानंतर वर्तमानपत्रांनी स्वत: बदल पण आता डिजिटल मीडिया, सोशल मीडिया वेगानं वाढत आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे छापून वर्तमानपत्रं विकणं कठीण झालं आहे.ग्रामीण भागात युट्यूब चॅनेल्स झाले आहेत. त्यामुळे बदलत्या काळानुर बदलण्याचं आव्हान पत्रकारांसमोर आहे. पत्रकारितेचे स्वरुप बदलत असलं तरी पत्रकारितेतली मूळ मूल्यं कायम रहाणार आहे,
म्हणून पत्रकार बांधवांनी आपल्या पत्रकारितेचे पावित्र्य जपावे. आपल्या स्वार्थासाठी सत्तेवर असलेले राजकारणी लोकांना पत्रकार निसंग करण्याचा वारंवार प्रयत्न करतात. यासाठी महाभारतातील वीर पुरुष अर्जुनाची जितकी श्रद्धा आणि विश्वास आपल्या धनुर्विद्येवर होता त्याच न्यायाने पत्रकारांनी आपली पत्रकारिता जपली पाहिजे,पत्रकारीता म्हणजे जगण्याचे साधन नाही.ते आपण समाजासाठी हाथी घेतलेले वृत आहे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर यांनी केले लोकशाहीतील पत्रकारिता ही लोकशाहीची जीवनवाहिनी आहे. समाजातील सर्वच घटकांना पत्रकारिता तारण्याचे काम करते.प्रशासनात काम करताना राजकारण्यांनाही असंख्य अडचणी येतात, प्रशासनातील नियम लोककल्याणाच्या जेंव्हा आड येतात त्यावेळेस फक्त पत्रकारिताच राजकारण्यांना तारू शकते. यामुळे भल्या भल्या राजकारण्यांची झोप उडविणारी पत्रकरिता याच भल्याभल्यांना तारक ठरते. असे मत जेष्ठ पत्रकार विकास शहा यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या