इंदापूर:लाखेवाडी (ता. इंदापूर,पुणे) इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावातील माने मळा येथील बाळासाहेब विठ्ठल माने यांची वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी म्हणून प्रमोशन झाल्या बद्दल रेडा ग्रामपंचायत नूतन सदस्य त्यांचे प्रतिनिधी नानासाहेब देवकर , पंढरीनाथ गायकवाड ,युवा नेते हनुमंत अंकुश देवकर, ह्यूमन राइट्स जनहित मानवाधिकार पुणे जिल्हाध्यक्ष , पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष, इलेक्ट्रोनिक मीडिया व प्रिंट मीडिया इंदापूर तालुका प्रतिनिधी कैलास पवार या सर्वांनी मिळून त्यांचा ( दि.३०) रोजी तुमच्या निवासस्थाने सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.
अतिशय सर्वसामान्य , शेतकरी कुटुंबातील
जन्मलेला हा युवक , बाळासाहेब माने यांचे वडील विठ्ठल माने ( माने मास्तर) हे म्हणजे लाखेवाडी, बावडा, निरा भीमा सहकारी साखर कारखाना परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून जनसामान्यांशी नाळ जोडली असणारे अशा व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पोटी हा जन्माला आलेला मुलगा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन बीकॉम पदवी घेतल्यानंतर त्यांनी एल.एल.बी पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर त्यांची गुप्तवार्ता अधिकारी म्हणून (सीआयडी) या विभाग नेमणूक झाली. सुरुवातीला यवतमाळ, नगर, सोलापूर अशा अनेक भागात गुप्तवार्ता अधिकारी म्हणून काम केले सध्या ते दौंड,इंदापुर, बारामती तीन तालुक्यासाठी गुप्तवार्ता अधिकारी म्हणून काम कार्यरत होते.
बाळासाहेब माने यांची नुकतीचं वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी म्हणून बढती मिळाली असून आपल्या बारा वर्षाच्या काळामध्ये अनेक महत्त्वाच्या गुन्ह्याचा त्यांनी चांगल्या तपास करून महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्याचेच फलित म्हणून त्यांची वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी म्हणून प्रमोशन मिळाले आहे. सर्वसामान्य, शेतकरी कुटुंबातून आलेल्या युवकांनी आपल्या कर्तुत्वाने वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी या पदापर्यंत झेप घेत इंदापूर तालुक्यातील युवकांनी पुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
इंदापूर तालुक्यातील बावडा, लाखेवाडी निरा भिमा सहकारी साखर कारखाना परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला , नाट्य, कृषी क्षेत्रामधून मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले जात आहे.
बाळासाहेब माने आपल्या सत्काराला कार्यक्रमाच्या वेळेस म्हणाले की, वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी (सीआयडी) डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सर्वसामान्यांसाठी आणि सर्वसामान्यांच्या कुटुंबातून आल्यामुळे मला सर्वसामान्यांच्या व्यथा माहित आहेत आणि ह्या व्यथा माहीत असल्यामुळे मी सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी काम करत राहणार आहे. किती ही मोठे पद भेटले किंवा कितीही मोठा माणूस झालो तरी मी सर्वसामान्यांनी आणि शेतकऱ्यांसाठी जेवढे माझ्या कडून होईल ते मी त्यांच्यासाठी करत राहणार आहे.
मितभाषी, शांत, साधी राहणीमान, उच्च विचार अशे व्यक्तिमत्व अशा व्यक्तिमत्त्वाची इतक्या मोठ्या पदावरती पदोन्नती मिळाल्याने नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये मित्र परिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या सत्कार कार्यक्रमासाठी रेडा ग्रामपंचायत नूतन सदस्य प्रतिनिधी म्हणून नानासाहेब देवकर , पंढरीनाथ गायकवाड, युवा नेते हनुमंत अंकुश देवकर आणि ह्युमन राइट्स जनहित मानवाधिकार पुणे जिल्हाध्यक्ष, पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया इंदापूर तालुका प्रतिनिधी पत्रकार कैलास पवार आदी मंडळी उपस्थित होते.
टिप्पण्या