भिमाई आश्रमशाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
इंदापूर:येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आणि मुलांचे , मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुल (जिजाऊनगर ) येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७१ वा वर्धापन दिन (दि.२६) सकाळी ठीक ८:२५ वा उत्साहात साजरा झाला. ध्वजारोहणापूर्वी भारताच्या संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन घेण्यात आले. तदनंतर गलांडवाडी नं २ च्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सौ आशाताई गोपीचंद गलांडे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. आणि ग्रामपंचायत सदस्या सौ. विद्याताई विलास शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.रत्नाकर मखरे, गलांडवाडीचे माजी सरपंच श्री. गोपीचंद गलांडे,संचालिका शकुंतला मखरे, सचिव ॲड. समीर मखरे, संचालक राहुल सवणे,संचालिका आनार्या मखरे, शिवाजीभाऊ चंदनशिवे, मधुकर जगताप, सामाजिक कार्यकर्ते गोरख तिकोटे, तसेच संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . कोविड- १९चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मास्क, सॅनिटायझर वापरण्यात आले. सामाजिक / शारीरिक आंतर पाळण्यात आले. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन कार्यक्रमावेळी करण्यात आले. उद्देशिकेचे वाचन श्री. हिरालाल चंदनशिवे सर यांनी केले तर सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार नानासाहेब सानप सर यांनी मानले. सदर कार्यक्रम भिमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
टिप्पण्या