मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर विचारमंथन परिवाराच्या वतीने खा. मा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसा निमित्त सोनाई परिवाराच्या वतीने सॅनिटायझर वाटप इंदापुर:मंगळवार दिनांक ३०.०६.२०२० रोजी दुपारी ४.०० वाजता इंदापूर येथील बाबा चौक ते एस टी स्टॅण्ड गेटच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी व पंचायत समिती चौक ते शिवाजी पुतळा खडकपुरा चौकापर्यत रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणारे फळ वाटप विक्रीते , हारवाले ,  हातगाडी धारक व किरकोळ सर्व व्यवसाय करणारे स्टाॅल धारक व्यापारी  यांना सॅनिटायझर ५०० मिलीच्या २५० बाॅटलचे वाटप खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसा निमित्य  पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य मा.सभापती, विद्यमान सदस्य जिल्हा परिषद पुणे,  सोनाई परिवाराचे कार्यकारी संचालक, मा. प्रविण भैया माने यांचे शुभहस्ते  सॅनिटायझर बाॅटलचे वाटप करण्यात आले . सदर कार्यक्रमास मा. अरविंद वाघ मा. उपनगराध्यक्ष इंदापूर नगरपरिषद , अमर गाडे नगरसेवक इंदापूर नगरपरिषद ,  शोएब बागवान , बाळासाहेब सरवदे , गणेश महाजन , शिवाजीराव मखरे , विशाल चव्हाण , नानासाहेब नरूटे , संदिपान कडव...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं  पंढरपूर,( लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज वृत्त सेवा)  दि. 1 जुलै:-   महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री  विठ्ठलाच्या चरणी आज घातले.        मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, श्री. तेजस ठाकरे उपस्थित होते.     श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

 शिवशाही बस मधून  इंदापुर मध्ये  संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दाखल, नंतर पंढरपूरला रवाना  इंदापुर नगरपालिकेचे धडाकेबाज मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस व विद्यमान नगरसेवक श्री. अनिकेत वाघ यांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले इंदापुर:जगात हाहाकार माजवणा-या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्रातील मानाच्या ९ पालख्यांना पंढरीकडे येण्याची परवानगी दिली आहे. त्या मधील जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादूका आज मंगळवार दि.३० जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाल्या. दि.३० जून रोजी शासकिय बंदोबस्तात  सजवलेल्या शिवशाही बस मधून इंदापूर मध्ये हा पालखी सोहळा दाखल होताच अल्पशा हरिनामाच्या गजरात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुकांना बसमध्येच पुष्पहार अर्पण करण्यात आला. पोलीस बंदोबस्तात दाखल झालेल्या सोहळ्यात काही मोजक्या प्रतिनिधींनाच पादूकांस पुष्पहार अर्पण करण्याची परवानगी दिली होती,  जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे आज इंदापूर शहरात...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंदापूर नगरपरिषदेतील महिला सफाई कर्मचारी यांना आरोग्य साहित्याचे किट व वृक्षरोपांचे वाटप इंदापूर (प्रतिनिधी): बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर तालुका व शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंदापूर नगरपरिषदेतील महिला सफाई कर्मचारी यांचा आरोग्य साहित्याचे किट व वृक्षरोपांचे वाटप करून सन्मान करण्यात आला.         समाजातील उपेक्षित घटक विधवा, परित्यक्ता, निराधार महिलांसाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांचे फार मोठे योगदान आहे. हिच प्रेरणा घेऊन आम्ही इंदापूर नगरपरिषदेतील महिला सफाई कर्मचारी यांचा सन्मान करीत आहे. कारण शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी स्वतःचे आरोग्य धोक्यात घालत असतात असे मत इंदापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा महिला विकास व बालकल्याण समिती सभापती राजश्री अशोक मखरे यांनी व्यक्त केले.     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर शहर मैत्रिण ग्रुपच्या अध्यक्षा अनुराधाताई गारटकर तर प्रमुख ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा   इंदापुर :तालुक्यातील ऊजणी धरणाच्या पायथ्याशी आसणा-या हिंगणगाव ता. इंदापुर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडाकेबाज कार्यकर्ते  नेहमीच सामान्य व गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी व सतत सामाजिक कार्यात अग्रेसर आसणारे,काटी वडापुरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा आसे,सर्वांना आपलं वाटणारे व्यक्तिमत्व एकदा काही कामा निमित्ताने रस्त्यावरून निघाले होते, मग एकपेरूवाला पप्पू पुणे-इंदापूर-सोलापूर हायवे म्हणजे जिल्हा परिषद सदस्य अभिजीत भैय्या तांबिले यांची कर्मभूमी आणि त्यांची 'यशवंती' अहो म्हणजे त्यांची  'इनोव्हागाडी' आणि तुमचा हा जीवाभावाचादोस्त जनतेचा सेवकम्हणून हजारो फे-या कामानिमित्त या हायवे वरून होत असतात. हे गाव-ते गाव परंतु आज मात्र या कर्मभूमीत आपल्या या रस्त्यावर आपलेच गावकरी तरूण युवा देखील पेरू,चिकू,आंबा आणि इतरत्र फळांच्या विक्रीचा व्यवसाय करत आहेत. गाडीतून पाहिले त्यांनी  ड्रायव्हर संदिपला सांगताच गाडी बाजुला घेत...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापुरात शेतकऱ्याच्या दुधाला लिटरला 62 रूपये दूधगंगा संघाने दिला दर,अमूलशी करारामुळे फायदा,अमूलच्या सहकार्याने पशुखाद्य, वैद्यकीय व अनेक सुविधा दिल्या जाणार-मा.ना.हर्षवर्धन पाटील                    इंदापूर येथील दुधगंगा दुध उत्पादक सहकारी संघाकडे दूध घालणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला म्हशीच्या दुधाला प्रति लिटरला रू. 62 एवढा समाधानकारक दर दि. 25 जून रोजी मिळाला आहे.तसेच दूधगंगा संघाकडून गाईच्या दुधाला प्रति लिटरला हमीभाव रू.25 मिळत असून,अनेक शेतकऱ्यांना दुधाच्या गुणवत्तेनुसार रू. 26, 27 असाही दर मिळत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.         दूधगंगा दूध संघाचे संस्थापक व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील दूध संघाने देशातील नावाजलेल्या अमूल बरोबर नुकताच करार केला असून दूध संघाचे संकलन दि.8 जून पासून सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या दुधाचे प्रत्येकी 10 दिवसाचे पेमेंट बँक खात्यामध्ये जमा केले जात आहे. दूधगंगा संघ हा इंदापूर तालुक्याती...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

शेटफळ तलाव 100 टक्के क्षमतेने भरून घ्या -हर्षवर्धन पाटील ,तलावात पाणी सोडण्यास प्रारंभ इंदापूर  तालुक्यातील शेटफळ-हवेली तलावात नीरा डावा कालव्यामधून शुक्रवार (दि.26) सायंकाळ पासून पाणी सोडण्यात येत आहे.सध्या तलावामध्ये सुमारे 20 टक्के पाणीसाठा आहे.शेटफळ तलाव 100 टक्के क्षमतेने भरल्याशिवाय तलावात सध्या सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात येऊ नये,अशी मागणी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यांच्याकडे केली आहे.                    ब्रिटिशकालीन असलेल्या शेटफळ तलावाची पाणी साठवण क्षमता 620 द.ल.घनफूट आहे. हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, वरच्या बाजूस असलेल्या  फलटण, बारामती आदी भागांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे, त्यामुळे तेथील पिकांना पाण्याची गरज नाही.सध्या तलावात नीरा डावा कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा सुमारे 175 ते 180 क्यूसेक्स क्षमतेचा आहे.त्यामध्ये तातडीने वाढ करावी,अशी सूचना हर्षवर्धन पाटील यांनी अधीक्षक अभियंता धोडपकर यांच्याशी चर्चा करतान...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

हर्षवर्धन पाटील यांची गणेशवाडीला तातडीने भेट - गणेशवाडीत आढळला कोरोनाचा रुग्ण - बावडा 3 दिवस बंद !  इंदापूरः तालुक्यातील गणेशवाडी-बावडा येथे कोरोनाचा 52 वर्षीय रुग्ण आढळून आला आहे. या व्यक्तीचा स्वॅब तपासणी अहवाल आज शनिवार (दि.27) सकाळी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तातडीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गणेशवाडी येथे भेट देऊन प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांसमवेत बैठक घेतली.                   दरम्यान,यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत बावडा गाव हे उद्या रविवार, सोमवार,मंगळवार असे एकूण 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गणेशवाडी येथे 7 दिवस बंद पाळण्यात येणार असल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.                   कोरोनाची लागण झालेली व्यक्ती औरंगाबाद येथील एका कंपनीमध्ये कामाला आहे. सदरची व्यक्ती गणेशवाडी येथे दि.23 रोजी आली. त्यानंतर दि. 25 रोजी इंदापूर येथे ही व्यक्ती तपासण्यासाठी गेली असता स्वॅबचा तपासणी अहवाल आज शनिवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बावडा परिस...

समृद्धी टाईम्स न्युज, स्वराज्य निर्माता न्युज

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी,इंदापुर विचार मंथन परिवार लय भारी, गोरगरीब जनतेस वेळोवेळी मदत करी, इंदापुर:राजर्षी छत्रपती शाहू महाराज. दीनदुबळ्या रयतेसाठी सत्ता राबवण्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर शाहूराजांनी आपल्या संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा घडवल्या.त्यांनी सत्ता राबवली. स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती ध्येयधोरणे आखून विकासासाठी शिवरायांचे वंशज असणाऱ्या कोल्हापूरच्या या गादीवरील या राजाने सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न केले आणि ते प्रत्यक्षात आणलेदेखील! राजा म्हटले की, ऐषोराम करणाऱ्या सत्तांधांची प्रतिमा नजरेसमोर येते. गाद्यागिद्यांवर लोळणाच्या राजांपेक्षा शाहूराजांनी आपल्या गादीची ताकद जनसामान्यांसाठी खर्ची घातलीनव्या युगाची पहाट ज्याच्या आगमनाने झाली, त्या या क्रांतिसूर्याचा जन्म २६ जून, १८७४ या दिवशी कोल्हापुरातील सिस्टर्स पॅलेस येथे झाला. कागल येथील जयसिंगराव तथा आबासाहेब घाटगे आणि राधाबाई राणीसरकार यांचे पुत्र यशवंतराव म्हणजेच कोल्हापूरचे क्रांतदर्शी छत्रपती राजर्षी शाहू महाराज होत.यशवंताचा जन्म झाला ,  अहमदनगरच्या तुरूंगात ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

हर्षवर्धन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सलून व्यवसायास परवानगी           इंदापुर :केंद्रीय स्तरावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी,केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर तसेच विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून सलून व्यावसायिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात केलेल्या पत्रव्यवहार, भ्रमणध्वनी द्वारे केलेल्या संपर्कामुळे, पाठपुराव्यामुळे सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.      महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य अध्यक्ष कल्याण दळे आणि इंदापूर तालुका नाभिक संघटना यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आपल्या विविध मागण्यासाठी निवेदन दिले होते.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्याने सलुन व्यवसायिकांना आपला व्यवसाय सुरू करण्यात परवानगी मिळाली आहे.   हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' लॉकडाउन नंतर अनेक व्यापारी व्यावसा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे साधेपणाने पंढरपूरकडे प्रस्थान,सरपंच द्रौपदा देवकर व नीरा भीमा कारखान्याचे संचालक बबनराव देवकर यांच्या हस्ते पादुकापूजन इंदापूर तालुक्यातील रेडा  येथील संत गुलाबबाबा मंदिरातून संत गुलाबबाबा पालखी सोहळा पायी वारीचे  प्रस्थांन (दि.२५ ) संध्याकाळी ६ वा. रेडा गावचे सरपंच द्रौपदा सुभाष देवकर आणि नीरा भीमा कारखान्याचे संचालक बबनराव देवकर यांच्या हस्ते पादुका पूजन करून करण्यात आले. मानाचे अश्‍व, मानाची रथाची बैलजोडी यांचे  पूजन करून यावेळी सोशल डिस्टन्स तंतोतंत पालन करत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने जो सोशल डिस्टन आणि नियमावली प्रमाणे पालखी सोहळ्यास परवानगी दिल्यानंतर मोचक्या भक्त मंडळीच्या  उपस्थित हा सात दिवसाचा  संत गुलाबबाबा पालखी सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती संत गुलाबबाबा संस्थानचे अध्यक्ष अँड. तानाजीराव बाबुराव देवकर यांनी पत्रकार मंडळीनां दिली.  संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे हे  १५ वे वर्ष असून आज पर्यंत संत गुलाबबाबा कृपेने पालखी सोहळ्याला कुठलीच अडचण आली नाही अनेक भक्तांना बाबाचे आश...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार   इंदापुर: महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.    पिंपरी खु. येथील अमोल नरुटे यांची नायब तहसीलदार पदी तर कळाशी येथील सुषमा रेडके यांची नायब तहसीलदार पदी तसेच काटी येथील पूजा गोरे यांची नायब तहसीलदार पदी,काटी येथील अमोल मोहिते यांची उपशिक्षणाधिकारी पदी आणि बाभूळगाव येथील मनोजसिंह खिलारे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

दूधगंगा दूध संघाच्या अवसायानाच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती-हर्षवर्धन पाटील फोटो:- इंदापूर येथे दूधगंगा दूध संघाच्या संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील.  इंदापुर:दुधगंगा दूध उत्पादक सहकारी संघ चालु राहू नये म्हणून राज्याचे दुग्धव्यवसाय विकास खात्याचे राज्यमंत्री असलेले इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे  जाणून-बुजून मंत्रीपदाचा वापर करून दबाव आणून अडथळे आणत आहेत.मात्र शासनाने दिलेल्या अवसायानाच्या अंतरिम आदेशाला उच्च न्यायालयाने दि.23 जून रोजी पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या मालकीच्या असलेल्या दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघा विरोधात तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेली भूमिका निंदनीय व शेतकरी विरोधी तसेच सहकार चळवळीच्या विरोधात आहे, अशी जोरदार टीका राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.24) इंदापूर येथे केली.              इंदापूर येथील दुधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाने जगप्रसिद्ध अमूल बरोबर करार केला असून संकलन दि.8 जून पासून स...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

योग दिन व गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपण करून वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावे:-  ह.भ.प.प्रदीप(दादा)पवार  इंदापुर:भारत भूमी ऋषी परंपरा व महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी मानला जाणारा देश आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ग्रामदैवत  इंद्रेश्वर यांच्या कृपाशीर्वादाने इंदापूर नगरीमध्ये इंदापूर येथील महाराष्ट्र एसटी आगार येथे कर्मचारी बंधू व भगिनी यांना आज कोरोनाच्या या रोगापासून बचाव करण्यासाठी आपल्या एसटी आगारामध्ये सोमवार दिनांक 22 जून रोजी सकाळी 11 वाजता प्रथम इंदापूर नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या वतीने कर्मचारी  वतीने एसटी आगारामध्ये व एसटी दुरुस्त केंद्रामध्ये डेपो परिसरामध्ये सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आली व त्यानंतर कार्यक्रम सुरुवात होण्याअगोदर सर्व एसटी कर्मचारी कामगार व सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते यांनी शहीद झालेल्या जवानांना प्रथमता भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना युवा अखिल भारतीय विद्यार्थ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

जिजाऊ इन्स्टिट्युट कालठण स्कुलचे नवोदय विद्यालय परिक्षेत उज्ज्वल यश                      इंदापुर: विश्व प्रतिष्ठान इंदापूर संचलित जिजाऊ इन्स्टिट्यूट, कालठण नं.1या स्कुलमध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी  कु.श्रुती रविन्द्र जगताप या विद्यार्थ्यीनीला  भारत सरकारच्यावतीने जवाहर नवोदय विद्यालय अंतर्गत घेतलेल्या परिक्षेत यश मिळाले.पुणे जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे यामध्ये कु.श्रुती रविन्द्र जगताप या विद्यार्थ्यीनीला नेत्रदीपक यश मिळाले असून पुणे जिल्ह्यात इंदापूर आणि जिजाऊ स्कुल कालठणचे नाव अभिमानाने उंचावले आहे. दर्जेदार शिक्षण,सर्व शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान, विद्यार्थ्यांना लागलेली शिक्षणाची आवड यामुळे बारावी विज्ञान विभागाचा 100% रिझल्ट, जवाहर नवोदय विद्यालय परिक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले यश, स्काॅलरशिप परिक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळालेले उज्ज्वल यश हे कौतुकास्पद आहे.. संस्थेच्या अध्यक्षा प्रा.डॉ.जयश्री गटकुळ  डॉ.भास्कर गटकुळ  यांनी अभिनंदन केले.प्राचार्या राजश...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इथेनॉल उत्पादनाबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचे सेमिनार” इंदापुर:कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखाना व निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संयुक्त सेमिनार राज्याचे माजी सहकार व संसदीय कामकाजमंञी, कारखान्याचे आदरणीय चेअरमन, मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील, व्हा.चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले, निरा-भिमा सह.साखर कारखान्याचे चेअरमन श्री. लालासो पवार, व्हा.चेअरमन श्री. कांतीलाल झगडे व दोन्ही कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांचे उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचे प्रतिनिधी डॉ.श्री. एस.व्ही. पाटील – हेड अल्कोहोल टेक्नॉलॉजिस्ट, श्री. राजेंद्र गोडगे – अल्कोहोल टेक्नॉलॉजिस्ट, डॉ.श्री. शिदनाळे – टेक्निकल ऍ़डव्हाईजर यांचे मार्गदर्शनार्थ ज्युस टू इथेनॉल सिरप टू इथेनॉल बी हेवी मोलासेस टू इथेनॉल या विषयावरील इथेनॉल उत्पादन वाढीसाठी महत्वपूर्ण सेमिनार पार पडले. त्यावेळी व्ही.एस.आय.चे प्रतिनिधींनी ज्यूस टू इथेनॉल, बी हेवी मोलासेस टू इथेनॉल सिरप टू इथेनॉल विषयी सविस्तर व सखोल चर्चा झाली. परिसंवादात मान्यवरांनी उपस्थित केलेल्या प्रश्...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

मंडप व्यवसायिकांच्या मागण्यांना न्याय मिळावा - हर्षवर्धन पाटील इंदापुर:कोरोना महामारीच्या संकटात सर्व मंडप व्यवसायिक मालक आणि कामगार यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक  नुकसान झाले असून मार्च, एप्रिल, मे हे लग्न समारंभाचे महिने असताना या काळातील लॉक डाऊनमुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यातच अलीकडे  त्यांना अत्यंत छोटा मंडप टाकण्यास परवानगी दिली आहे. मात्र सोशल डिस्टेंसिंग नियमांचा अवलंब करुन 50 लोकांची बैठक व्यवस्थेसाठी 45 बाय 60 चा मंडप बांधण्याची गरज असतांना त्यांना अतिशय लहान आकाराचा मंडप बांधण्याची परवानगी दिली आहे ती वाढवून  45 बाय 60 फुट या आकाराची परवाणगी मिळावी यासाठी इंदापूर तालुका मंडप मालक संघटना यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील शासनाकडून मंडप व्यावसायिकांच्या मागण्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे असे मत व्यक्त केले.    इंदापूर तालुका मंडप मालक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र धारूरकर, खजिनदार राजेशा मुलाणी तसेच इतर सदस्य यांनी हर्षवर्धन पाट...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

जातेगाव येथील माजी सैनिक कै. मनोज औटी यांचा खून करणा-या गुन्हेगारांना फाशीची सजा झाली पाहिजे- सर्व माजी सैनिक इंदापुर:शनिवार दि.20/6/2020 रोजी जातेगाव येथील माजी सैनिक कै. मनोज औटी यांच्या दशक्रिया विधी संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी मंदिरांमध्ये उपस्थित सर्व माजी सैनिकांची छोटीसी मीटिंग घेऊन उपस्थित सर्व माजी सैनिकांच्या बरोबर फेडरेशन विषयी सर्व माहिती देऊन विचार विमर्श करून त्यावर चर्चा झाली व त्याच वेळी तेथील मिटिंग संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्व माजी सैनिक राळेगण-सिद्धी येथील सैनिकांचे आधारस्तंभ अण्णा हजारे साहेब यांची भेट घेऊन सैनिकांच्या विषयी होत असलेल्या अन्याय विषयी आडचणी विषयी  आघाडीचे अध्यक्ष नारायन आंकुशे साहेब ब्रिगेडियर माजी खासदार सुधीर सावंत साहेब सुभाष दरेकर साहेब संदीप भाऊ लगड हनुमंत निंबाळकर साहेब बीएफ निंबाळकर शामराव धुमाळ साहेब शिवाजी कदम साहेब  नरसाळे साहेब महादेव सोमवंसी फ्लेचर पटेल साहेब अनिल खेडकर मुंडे साहेब थेऊरकर साहेब अर्जुन खेडकर सौ पुष्पाताई मुंडे डॉ आर्चना आघाव व इतर अनेक उपस्थित माजी सैनिकांनी आपल्या व्यथा मांडल्या व तसे...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

जिवनात कितीही संकटे आली तरी प्रयत्न करत रहा एक दिवस यश तुमच्या पायाशी लोळण घेईल - दशरथ दादा माने इंदापूर: विचारमंथन परिवाराच्या वतीने आज राधिका हॉल येथे आदरणीय माने दादा यांचा तसेच  श्रीकांत मखरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी माने दादांचा सत्कार कस्तुरबा बोर्डींग चे माजी अधिक्षक मा .मोरे सर यांचे हस्ते तसेच इंदापूर कृषी उत्पन्न समितीचे माजी उपसभापती पांडूरंगतात्या मारकड माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे यांचे उपस्थितीत वाढदिवस साजरा करणेत आला.         ' या वेळी सत्काराला उत्तर देताना माने दादांनी आपला जीवनपट सांगितला आयुष्यात आलेली संकटे त्यांना न डगमगता सामोरे गेलो त्यामुळेच यश प्राप्त झाले . तालुक्यातील सर्व जनतेने आजपर्यंत माने कुटुंबाला साथ दिली त्याबद्दल आभार मानले इथून पुढे ही तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू असे दादांनी सांगितले विचारमंथन ग्रुप हा सर्व क्षेत्रातील वैचारिक पातळी असलेला ग्रुप आहे या ग्रुपच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी सोनाई परिवार तुमच्या सदैव सोबत राहिल अशी ग्वाही माने दादांनी दिली या कार्यक्रमा...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

ग्रामस्थांचे उद्ध्वस्त झालेले संसार वनराज्यमंत्र्यांनी उभा करुन द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल-मा.ना.हर्षवर्धन पाटील  मातीच्या ढिगा-याखालून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे फ्रेम तुटलेले छायाचित्र काढण्यात आले इंदापूर :वनविभागाने काढलेल्या अतिक्रमणानंतर उद्ध्वस्त झालेल्या घरदार,जमिनींचे प्रकरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गोखळी गावात जावून अतिक्रमण काढल्याचा तडाखा बसलेल्या ग्रामस्थांची भेट घेतली.पाहणी केली.झाल्या प्रकाराचा तीव्र निषेध करताना या घटनेला सर्वस्वी वनराज्यमंत्री जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला.या ग्रामस्थांचे उद्ध्वस्त झालेले संसार वनराज्यमंत्र्यांनी उभा करुन द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पाटील यांनी दिला आहे.   दोन दिवसांपूर्वी वनविभागाने वनपरिक्षेत्रात झालेले अतिक्रमण काढण्याच्या कारवाई दरम्यान अठरा एकर क्षेत्रावरील पिके व घरे उद्ध्वस्त केली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर पोलीसांनी कारवाईमध्ये हस्तक्षेप केला. कारवाई थांबली.आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हर्...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

साखरेचा किमान विक्री दर 3100रू, वरून 3500रू. करणे अत्यावश्यक केंद्राकडे पाठपुरावा करणार-मा.ना.हर्षवर्धन पाटील  इंदापुर:साखरेचा किमान विक्री दर व एफआरपी यांचा समन्वय बसत नसल्याने साखर उद्योग गेली 3 वर्षांपासून अडचणीत आलेला आहे. या अडचणीतून साखर उद्योगाला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) रू. 3500 करावा, अशी मागणी राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.19) केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.                साखर कारखान्यांचा साखर उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी, सद्य:स्थितीमध्ये उत्पादन खर्च व एफआरपीची तुलना करता साखर कारखान्यांना प्रतिटन सुमारे रू.400 एवढा तोटा सहन करावा लागत आहे. या अडचणीतून साखर उद्योगाला बाहेर काढण्यासाठी साखरेचा किमान  विक्री दर हा रू.3100 वरून रू. 3500 करणे अत्यावश्यक आहे.या मागणीसाठी  केंद्र सरकारकडे विविध स्तरावरून  पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. ...