इंदापुर:कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखाना व निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संयुक्त सेमिनार राज्याचे माजी सहकार व संसदीय कामकाजमंञी, कारखान्याचे आदरणीय चेअरमन, मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील, व्हा.चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले, निरा-भिमा सह.साखर कारखान्याचे चेअरमन श्री. लालासो पवार, व्हा.चेअरमन श्री. कांतीलाल झगडे व दोन्ही कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांचे उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचे प्रतिनिधी डॉ.श्री. एस.व्ही. पाटील – हेड अल्कोहोल टेक्नॉलॉजिस्ट, श्री. राजेंद्र गोडगे – अल्कोहोल टेक्नॉलॉजिस्ट, डॉ.श्री. शिदनाळे – टेक्निकल ऍ़डव्हाईजर यांचे मार्गदर्शनार्थ ज्युस टू इथेनॉल सिरप टू इथेनॉल बी हेवी मोलासेस टू इथेनॉल या विषयावरील इथेनॉल उत्पादन वाढीसाठी महत्वपूर्ण सेमिनार पार पडले. त्यावेळी व्ही.एस.आय.चे प्रतिनिधींनी ज्यूस टू इथेनॉल, बी हेवी मोलासेस टू इथेनॉल सिरप टू इथेनॉल विषयी सविस्तर व सखोल चर्चा झाली. परिसंवादात मान्यवरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देऊन केंद्र सरकारने इथेनॉलसाठी नविन केलेले धोरण, चांगला दिलेला दर याविषयी सेमिनारमध्ये सविस्तर चर्चा होऊन साखर कारखान्यामध्ये साखरेचा साठा विक्रीअभावी वाढलेने सतत येणा-या अडचणीमुळे साखरेच्या किंमती कमी होणे यावरती इथेनॉल निर्मिती हा कायमस्वरूपी व शाश्वत पर्याय आहे. केंद्रसरकारने इथेनॉलचे दर कायम ठेवले आहेत. त्यात बदल होत नाही. इथेनॉलची इंधनासाठी मागणी भविष्यात वाढतच जाणार आहे. इथेनॉल वापरामुळे पर्यावरणाची हानी रोखली जाते. इथेनॉलनिर्मितीमुळे साखर कारखान्यास अधिकचा महसूल मिळून सभासदांना त्याचा फायदा होणार आहे. सिरप टू इथेनॉल किंवा बी हेवी मोलासेस टू इथेनॉलमुळे बाजारातील साखर साठा कमी होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापरली जाणार आहे. पर्यायाने अतिरिक्त साखर कमी होऊन साखरेचे दर वाढणार आहेत. इथेनॉलचा वापर व दर चांगला असल्याने त्वरित पैसे मिळून विक्रीविना पडून राहणा-या पोत्यांवरील व्याजाचा बोजा कमी होणार आहे. सिरप टू इथेनॉल किंवा बी हेवी मोलासेस टू इथेनॉलमुळे स्टिम, वीज यामध्ये बचत होऊन कारखान्याचा क्रशिंग रेट तसेच आसवनीची क्षमता वाढणार आहे. साखरेच्या दर्जामध्ये सुधारणा होणार आहे.
याप्रसंगी कारखान्याचे आदरणीय चेअरमन, राज्याचे माजी सहकार व संसदीय कामकाजमंञी, मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील, व्हा.चेअरमन मा.श्रीमती पद्माताई भोसले, निरा-भिमा सह.साखर कारखान्याचे चेअरमन श्री. लालासो पवार, व्हा.चेअरमन श्री. कांतीलाल झगडे व दोन्ही कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक श्री.बी.जी. सुतार, निरा-भिमा कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक श्री. गेंगे, तसेच दोन्ही कारखान्याचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
टिप्पण्या