इंदापुर: विश्व प्रतिष्ठान इंदापूर संचलित जिजाऊ इन्स्टिट्यूट, कालठण नं.1या स्कुलमध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी कु.श्रुती रविन्द्र जगताप या विद्यार्थ्यीनीला भारत सरकारच्यावतीने जवाहर नवोदय विद्यालय अंतर्गत घेतलेल्या परिक्षेत यश मिळाले.पुणे जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे यामध्ये कु.श्रुती रविन्द्र जगताप या विद्यार्थ्यीनीला नेत्रदीपक यश मिळाले असून पुणे जिल्ह्यात इंदापूर आणि जिजाऊ स्कुल कालठणचे नाव अभिमानाने उंचावले आहे. दर्जेदार शिक्षण,सर्व शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान, विद्यार्थ्यांना लागलेली शिक्षणाची आवड यामुळे बारावी विज्ञान विभागाचा 100% रिझल्ट, जवाहर नवोदय विद्यालय परिक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले यश, स्काॅलरशिप परिक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळालेले उज्ज्वल यश हे कौतुकास्पद आहे.. संस्थेच्या अध्यक्षा प्रा.डॉ.जयश्री गटकुळ डॉ.भास्कर गटकुळ यांनी अभिनंदन केले.प्राचार्या राजश्री जगताप यांनी अथक परिश्रम घेतले, शेखर साळवे, रेखा जगताप,सुहास शिंदे अर्चना शिदे प्रियांका देवकर आशिया शेख,सागर उंबरे, यांचे शैक्षणिक मार्गदर्शन मोलाचे लाभले
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या