हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
इंदापुर: महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पिंपरी खु. येथील अमोल नरुटे यांची नायब तहसीलदार पदी तर कळाशी येथील सुषमा रेडके यांची नायब तहसीलदार पदी तसेच काटी येथील पूजा गोरे यांची नायब तहसीलदार पदी,काटी येथील अमोल मोहिते यांची उपशिक्षणाधिकारी पदी आणि बाभूळगाव येथील मनोजसिंह खिलारे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.
टिप्पण्या