इंदापूर (प्रतिनिधी): बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर तालुका व शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंदापूर नगरपरिषदेतील महिला सफाई कर्मचारी यांचा आरोग्य साहित्याचे किट व वृक्षरोपांचे वाटप करून सन्मान करण्यात आला.
समाजातील उपेक्षित घटक विधवा, परित्यक्ता, निराधार महिलांसाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांचे फार मोठे योगदान आहे. हिच प्रेरणा घेऊन आम्ही इंदापूर नगरपरिषदेतील महिला सफाई कर्मचारी यांचा सन्मान करीत आहे. कारण शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी स्वतःचे आरोग्य धोक्यात घालत असतात असे मत इंदापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा महिला विकास व बालकल्याण समिती सभापती राजश्री अशोक मखरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर शहर मैत्रिण ग्रुपच्या अध्यक्षा अनुराधाताई गारटकर तर प्रमुख पाहुण्या इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर होत्या.
याप्रसंगी नगरसेविका हेमलता माळुंजकर, महिला शहराध्यक्षा उमाताई इंगोले, स्मिता पवार, मंगलताई ढोले, उज्वला चौगुले, माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे, मुख्याधिकारी डाॅ. प्रदीप ठेंगल, प्रा. अशोक मखरे, दादासाहेब सोनवणे, श्रीनिवास घोलप, डाॅ. शरद पडसळकर, मुकादम बापुराव मखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या