शिवशाही बस मधून इंदापुर मध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दाखल, नंतर पंढरपूरला रवाना
इंदापुर:जगात हाहाकार माजवणा-या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने
महाराष्ट्रातील मानाच्या ९ पालख्यांना पंढरीकडे येण्याची
परवानगी दिली आहे. त्या मधील जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम
महाराजांच्या पादूका आज मंगळवार दि.३० जून रोजी
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रयत शिक्षण संस्थेच्या
सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात दाखल
झाल्या. दि.३० जून रोजी शासकिय बंदोबस्तात सजवलेल्या
शिवशाही बस मधून इंदापूर मध्ये हा पालखी सोहळा दाखल
होताच अल्पशा हरिनामाच्या गजरात जगद्गुरु तुकाराम
महाराजांच्या पादुकांना बसमध्येच पुष्पहार अर्पण करण्यात
आला. पोलीस बंदोबस्तात दाखल झालेल्या सोहळ्यात काही
मोजक्या प्रतिनिधींनाच पादूकांस पुष्पहार अर्पण करण्याची परवानगी दिली होती,
जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे आज इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या रिंगण सोहळा प्रांगणामध्ये बसमधून आगमन झाले. यावेळी प्रांतअधिकारी श्री दादासाहेब कांबळे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर साहेब, नगराध्यक्षा सौ.अंकिता शहा, तहसीलदार सौ.सोनाली मेटकरी, पोलीस निरीक्षक श्री.नारायण सारंगकर , मुख्याधिकारी डॉ.प्रदिप ठेंगल यांनी शासनाच्या वतीने पादुकांचे स्वागत केले.
सदर मंगलमयप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इंदापुर नगरपालिकेचे धडाकेबाज मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस व विद्यमान नगरसेवक श्री. अनिकेत वाघ यांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले तसेच पालखी सोहळा प्रमुखांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला व बस चालक, कर्मचारी यांना सॅनिटायझरचे वाटप करून त्यांचादेखील सत्कार केला. कदम विद्यालयाच्या वतीने श्री.मोहिते सर यांनी स्वागत केले.या वेळी श्रीधर बाब्रस म्हणाले की हे विठ्ठला कोरोना सारख्या महाभयंकर व्हायरस पासून सर्वांना वाचवरे बाबा....
टिप्पण्या