इंदापूर: विचारमंथन परिवाराच्या वतीने आज राधिका हॉल येथे आदरणीय माने दादा यांचा तसेच
श्रीकांत मखरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी माने दादांचा सत्कार कस्तुरबा बोर्डींग चे माजी अधिक्षक मा .मोरे सर यांचे हस्ते तसेच इंदापूर कृषी उत्पन्न समितीचे माजी उपसभापती पांडूरंगतात्या मारकड माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे यांचे उपस्थितीत वाढदिवस साजरा करणेत आला.
' या वेळी सत्काराला उत्तर देताना माने दादांनी आपला जीवनपट सांगितला आयुष्यात आलेली संकटे त्यांना न डगमगता सामोरे गेलो त्यामुळेच यश प्राप्त झाले . तालुक्यातील सर्व जनतेने आजपर्यंत माने कुटुंबाला साथ दिली त्याबद्दल आभार मानले इथून पुढे ही तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू असे दादांनी सांगितले विचारमंथन ग्रुप हा सर्व क्षेत्रातील वैचारिक पातळी असलेला ग्रुप आहे या ग्रुपच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी सोनाई परिवार तुमच्या सदैव सोबत राहिल अशी ग्वाही माने दादांनी दिली या कार्यक्रमासाठी विचारमंथन ग्रुपचे ॲडमीन' माजी उपनगराध्यक्ष अरविंद ( तात्या ) वाघ , प्रा. कृष्णाजी ताटे , सामाजिक कार्यात अग्रेसर आसणारे मा.बाळासाहेब सरवदे, संदिपान कडवळे ,अनिकेत वाघ नगरसेवक , शिवाजीराव मखरे , अजिंक्य वाघ , किरण कणसे , उमेश मखरे, हमीदभाई आतार, नितीनदादा आरडे , ॲड् . विशाल चव्हाण , वाल्मीक खानेवाले , निखील बंगाळे , निरज खानेवाले,ॲड. नारायण ढावरे, माजी नगरसेवक राजेश शिंदे, पत्रकार शैलेश काटे, सुधाकरबोराटे यांचे सह विचारमंथन परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते
महाराष्ट्राचे लाडके गायक विजय सरतापे यांनी आपल्या गोड आवाजात सुंदर अशी भक्तिगीते सादर केली
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माऊली नाचण यांनी केले, यावेळी दशरथ माने यांच्या वतीने सोनाई तुपाचे हजर आसणा-या प्रत्येक सदस्याला वाटप करण्यात आले,
टिप्पण्या