मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूर तालुक्यातील रेडा  येथील संत गुलाबबाबा मंदिरातून संत गुलाबबाबा पालखी सोहळा पायी वारीचे  प्रस्थांन (दि.२५ ) संध्याकाळी ६ वा. रेडा गावचे सरपंच द्रौपदा सुभाष देवकर आणि नीरा भीमा कारखान्याचे संचालक बबनराव देवकर यांच्या हस्ते पादुका पूजन करून करण्यात आले. मानाचे अश्‍व, मानाची रथाची बैलजोडी यांचे  पूजन करून यावेळी सोशल डिस्टन्स तंतोतंत पालन करत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने जो सोशल डिस्टन आणि नियमावली प्रमाणे पालखी सोहळ्यास परवानगी दिल्यानंतर मोचक्या भक्त मंडळीच्या  उपस्थित हा सात दिवसाचा  संत गुलाबबाबा पालखी सोहळा संपन्न होणार आहे अशी माहिती संत गुलाबबाबा संस्थानचे अध्यक्ष अँड. तानाजीराव बाबुराव देवकर यांनी पत्रकार मंडळीनां दिली.
 संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे हे  १५ वे वर्ष असून आज पर्यंत संत गुलाबबाबा कृपेने पालखी सोहळ्याला कुठलीच अडचण आली नाही अनेक भक्तांना बाबाचे आशीर्वाद लाभल्यामुळे सर्वांना सुख आणि समाधान , परमानंद अमृतवाणीचा लाभ  भेटला आहे .
 तसेच बावडा येथील बागल फाटा, श्रीपुर मायनर सेक्शन  दत्तमंदिर, बंडीशेगाव,  कोळ्याचा मळा,  वाखरी, पंढरपुर असे मुक्काम करत  दर मजल करत पंढरपूर कडे जात असतो .
कोरोना व्हायरसमुळे आलेल्या संकटामुळे हा पालखी सोहळा अतिशय साधेपणाने करण्याचा संत गुलाबबाबा संस्थांन विश्वस्त मंडळीच्या बैठकीत निर्णय घेतला. शासनाने  जे नियम घालून दिले आहेत व  अटी शर्तीवर हा पालखी सोहळा संपन्न होत आहे.
 या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यातून,  भारत देशातून,  परदेशातून अनेक भक्त येत असतात. पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा  मान रेडा गावचे रहिवासी  शिवाजी जाधव यांच्या सर्जा आणि लाडक्या बैलजोडीला असतो . अनेक भक्त मंडळी भोजनाच्या पंगती देत आसतात . इंदापूर व आजूबाजुच्या तालुक्यांमधील संत गुलाबबाबा भक्तांची मोठी गर्दी  पालखी सोहळ्यासाठी होत असते.
या पालखी प्रस्थानांसाठी अतिथी म्हणून जिमी अल्मेडा मुंबई,  सोनू मामा भाटिया संत गुलाबबाबा संस्थान,  अध्यक्ष काटेल धाम , तालुका संग्रामपुर , जिल्हा बुलढाणा,  ज्ञानेश्वर भाऊ उमक संत गुलाबबाबा समाधी मंदिर संस्थान अध्यक्ष टाखरखेड मोरे , तालुका अंजनगाव सुर्जी,  जिल्हा अमरावती, चंद्रकुमार अग्रवाल, दिनेश सुंद्राणी रायपूर, अँड. गोपाल उमक, दामोदर वानखेडे, डाँ.शिवाजीराव पाटील,  उल्हास आदाते मुंबई, जयंत मामा विरार, संजय थोरात मुंबई, बाबासाहेब दगडे ठाणे, शाहीर मुरलीधर लोणाग्रे,प्रकाश देशमुख मुंबई, नंदुभाऊ पालुंदरकर शहापुर, निशांत गायकवाड मुंबई,  संजय खाडे, संजय देवकृष्ण साळी पुणे ,नथुकाका रोकडे नागपुर ,राजन खाडे ठाणे, दिनेश देशमुख  औरगांबाद , रामदासभाऊ पावशी,  झी मिडियाचे प्रशांत अंकुशराव, आर्या अंकुशराव, सुषमाताई गायकवाड मुंबई, नम्रता पवार पुणे, अँड. योगेश देवकर आणि नंदुरबार येथून राजू बागुल त्यांची सर्व भक्त मंडळ ,  पुणे येथून विश्वास पवार त्यांची सर्वभक्त मंडळ,अलिबाग वरून बाळूभाऊ लाड  आणि त्यांचे सर्व भक्त मंडळ , औरंगाबादचे  राम पंडित आणि त्यांची सर्व भक्त मंडळ, कोपरगाव वरून ऐकनाथ जाधव, टेलर यांचे भक्त मंडळ अशा अनेक भागातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गुलाब बाबांचे भक्त येत असतात .
त्यामध्ये अनेक व्यवसायिक, उद्योगपती भक्त मंडळी या सोहळ्यासाठी सामील होत असतात आणि मोठ्या दिमाखात हा रेडा तालुका इंदापूर येथून ते पंढरपूर येथे पालखी सोहळा पायवारी होत असतो अनेक भक्तगण असतात त्यांमध्ये  बँडपथक मिटूभाऊ यांचे असते, अश्व अवदुत कासार सराफवाडी  असते, संत गुलाबबाबा रथ गेली अठरा वर्षे चालवणारे प्रकाश मिसाळ असे अनेक भक्त उपस्थित असतात. मानाचे तुळशी, विणकरी ,मृदंगाचार्य, वाहन सहकार्य , मानाचे चोपदार , भोजन कमिटी स्पीकर व्यवस्था,  वैद्यकीय सेवा , आचारी,  तंबू सहकार्य असे अनेक मंडळी सहकार्य करत असतात. 
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संत गुलाबबाबा संस्थान अध्यक्ष विश्वस्त मंडळींनी निर्णय घेतला कि शासनाने जे नियम घालून दिले आहेत त्या नियमाप्रमाणे  पाच ते सहा लोकांच्या उपस्थित या वर्षीचा पालखी सोहळा संपन्न होणार असून अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष ॲड. तानाजीराव देवकर यांनी दिली.
 संत गुलाबबाबा पालखी सोहळा साधेपणाने प्रस्थान झाल्यानंतर  (दि.२५) जुलै संध्याकाळी सात ते आठ  भजनाचा कार्यक्रम सोशल डिस्टन्स पाळत फेसबुक लाईव्ह कार्यक्रम  संपन्न झाला.  हा कार्यक्रम  भारतातील प्रत्येक राज्यातील आणि परदेशात ही भक्तमंडळीने त्याचा लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.
 त्यामध्ये संत गुलाबबाबा संस्थानचे विश्वस्त ,सचिव , रेडा गावाचे सरपंच द्रौपदा सुभाष देवकर,  नीरा-भीमा कारखान्याचे संचालक बबनराव देवकर , संत गुलाबबाबा संस्थानचे अध्यक्ष अँड. तानाजीराव देवकर , ग्रा. सदस्य , रेडा वि.वि.का.चेअरमन व संचालक तसेच तुकाराम जगदाळे , तुकाराम देवकर , प्रा. आत्माराम देवकर, नानासाहेब देवकर,  धनंजय गायकवाड , काशिनाथ देवकर, कैलास पवार पत्रकार टीव्ही रिपोर्टर,  पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष,  सोमनाथ देवकर,  संतोष देवकर,  अशोक महाराज मोहिते,  अनिल महाराज मोहिते, उंबराव महाराज देवकर ,माजी उपसरपंच भीमराव यादव , सोमनाथ महाराज पोळ,  दिलीप देवकर ,गणपत शिंदे , बापू शिंदे अनेक मान्यवर उपस्थित होते  येथील संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे प्रस्थान संत गुलाबबाबा भक्त मंडळी व इतर मान्यवर उपस्थित संपन्न या कार्यक्रमाचे सर्व  छाया चित्रन कैलास पवार यांनी केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते