मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

मंडप व्यवसायिकांच्या मागण्यांना न्याय मिळावा - हर्षवर्धन पाटील
इंदापुर:कोरोना महामारीच्या संकटात सर्व मंडप व्यवसायिक मालक आणि कामगार यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक  नुकसान झाले असून मार्च, एप्रिल, मे हे लग्न समारंभाचे महिने असताना या काळातील लॉक डाऊनमुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यातच अलीकडे  त्यांना अत्यंत छोटा मंडप टाकण्यास परवानगी दिली आहे. मात्र सोशल डिस्टेंसिंग नियमांचा अवलंब करुन 50 लोकांची बैठक व्यवस्थेसाठी 45 बाय 60 चा मंडप बांधण्याची गरज असतांना त्यांना अतिशय लहान आकाराचा मंडप बांधण्याची परवानगी दिली आहे ती वाढवून  45 बाय 60 फुट या आकाराची परवाणगी मिळावी यासाठी इंदापूर तालुका मंडप मालक संघटना यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी संसदीय व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील शासनाकडून मंडप व्यावसायिकांच्या मागण्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे असे मत व्यक्त केले.
   इंदापूर तालुका मंडप मालक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र धारूरकर, खजिनदार राजेशा मुलाणी तसेच इतर सदस्य यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. हर्षवर्धन पाटील यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी आणि पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना फोन द्वारे संपर्क करून या व्यावसायिकांच्या मागण्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली.
     हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' सरकारच्या आदेशानुसार 23 मार्च पासून मंडप व्यवसाय पूर्णपणे बंद असून मंडप मालकावर व कामगार उपासमारीची वेळ आली आहे. पुण्यातील एका मंडप व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आल्याने आत्महत्या करून जीवन संपवले आहे. या व्यावसायिकांना कोणत्या प्रकारची शासकीय मदत मिळत नाही व  बँकाकडून तसेच इतर घटकाकडून त्यांनी घेतलेले कर्ज आहे. मंडप व्यवसाय बंद असल्यामुळे ते कर्ज फेडू शकत नाही यामुळे ते संकटात सापडले आहेत या परिस्थितीत सरकारच्या नियमानुसार तसेच सोशल डिस्टन्स चा वापर करून 45×60 चा मंडप बांधण्यास परवानगी मिळावी ही त्यांची मागणी रास्त असून सरकार दरबारी त्यांना यासाठी परवानगी मिळावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार - फडतरे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीत जनशक्तीच्या जोरावर काँग्रेसच बाजी मारणार असल्याचा आशावाद काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष साहेबराव फडतरे यांनी व्यक्त केला. वाल्हे ( ता. पुरंदर ) येथील महर्षी वाल्मीकी ऋषींच्या मंदिरात काँग्रेससह उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून साहेबराव फडतरे यांच्या निवडीबद्दल सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देताना फडतरे हे बोलत होते. ते पुढे म्हणाले आज मिळालेला सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. या सन्मानामुळे मला माझ्या कामाची जबाबदारी अधिक जाणवते. यापुढेही मी माझ्या कार्यातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह पुरंदर पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकतीने रिंगणात उतरणार आहे. याप्रसंगी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे शिक्षक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष सचिन दुर्गाडे तसेच किरण कुमठेकर माजी सभापती गिरीश पवार सामाजिक कार्यकर्ते अतिश...