मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज


इंदापुर:शनिवार दि.20/6/2020 रोजी जातेगाव येथील माजी सैनिक कै. मनोज औटी यांच्या दशक्रिया विधी संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी मंदिरांमध्ये उपस्थित सर्व माजी सैनिकांची छोटीसी मीटिंग घेऊन उपस्थित सर्व माजी सैनिकांच्या बरोबर फेडरेशन विषयी सर्व माहिती देऊन विचार विमर्श करून त्यावर चर्चा झाली व त्याच वेळी तेथील मिटिंग संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्व माजी सैनिक राळेगण-सिद्धी येथील सैनिकांचे आधारस्तंभ अण्णा हजारे साहेब यांची भेट घेऊन सैनिकांच्या विषयी होत असलेल्या अन्याय विषयी आडचणी विषयी 
आघाडीचे अध्यक्ष नारायन आंकुशे साहेब ब्रिगेडियर माजी खासदार सुधीर सावंत साहेब सुभाष दरेकर साहेब संदीप भाऊ लगड हनुमंत निंबाळकर साहेब बीएफ निंबाळकर शामराव धुमाळ साहेब शिवाजी कदम साहेब  नरसाळे साहेब महादेव सोमवंसी फ्लेचर पटेल साहेब अनिल खेडकर मुंडे साहेब थेऊरकर साहेब अर्जुन खेडकर सौ पुष्पाताई मुंडे डॉ आर्चना आघाव व इतर अनेक उपस्थित माजी सैनिकांनी आपल्या व्यथा मांडल्या व तसेच सैनिकांचे प्रश्न 
सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम आजी-माजी सैनिक संघटना एकत्रित करून फेडरेशन बनवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असणारे नारायण अंकुशे साहेब सुधीर सावंत साहेब सुभाष दरेकर साहेब यानी या विषयी सर्व माहिती देऊन त्या विषयी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले व त्याविषयी अण्णांना सविस्तर माहिती दिली असता अण्णांच्या कडून आपण फेडरेशन साठी ग्रीन सिग्नल भेटला व व सर्वजण उशिरा का होईना पण जागे झालात काही हरकत नाही हे जे फेडरेशन बनवण्यासाठी  आपण सर्वांनी एकत्रित येऊन  तयारी दर्शविली आहे त्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले व असे सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणाऱ्या सैनिकांना आपण सर्वांनी सपोर्ट करणे जरुरी आहे असे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितले काही व फेडरेशन कसे असावे ते कसे चालवावे या विषयी थोडक्यात उपस्थित सर्व माजी सैनिकांना मार्गदर्शन सुद्धा केले व मी ह्या फेडरेशन मध्ये सहभागी होणार नाही परंतु फेडरेशन चालवण्यासाठी कुठल्याही मदतीची गरज भासल्यास मी आपणास बाहेरून सर्वतोपरी मदत जरूर करीन हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. 
 त्याच प्रसंगी नारायण आंकुशे ब्रिगेडियर सावंत यांनी अण्णा हजारे यांना शब्द दिला की लवकरात लवकर फेडरेशनची पूर्ण तयारी करून ह्याच ठीकाणी तुमच्याच हाताने उद्घाटन करून सुरुवात केली जाईल.असेही ते म्हणाले, 
 त्या गुन्हेगारांना फाशीची सजा झाली पाहिजे अशी मागणी करत महाराष्ट्रातील सर्व माजी सैनिक संघटना एकत्र आल्या होत्या त्यामध्ये इंदापूर शहरातील माजी सैनिक व शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी मेजर रविराज पवार मेजर मंगेश जाधव मेजर मंगेश सोनवळ त्या गावांमध्ये जाऊन त्या परिवाराच्या दुःखामध्ये सामील झाले होते सर्व सैनिकांनी यापुढेही कोणत्याही सैनिकांवर अन्याय झाला महाराष्ट्रातील सर्व माजी सैनिक सैनिक एकत्र येऊन अशा प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवला जाईल ज्या सैनिकांनी देशासाठी मातृभूमीसाठी आपल्या परिवारापासून दूर राहून आपल्या जीवावर खेळून देशाचे रक्षण करणारा सैनिक यापुढे त्याच्यावर होणारा अन्याय सहन करणार नाही वयानंतर राळेगण-सिद्धी या ठिकाणी जाऊन माजी सैनिक अण्णा हजारे साहेब यांच्याशी ही मुलाखत करण्यात आली त्यांनीही या जवानाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे
भारतीय सेनेमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या रेजिमेंट आहेत...
पंजाब रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, डोग्रा रेजिमेंट, मराठा लाइट इंफंट्री व महार रेजिमेंट ह्या त्यातल्या काही रेजिमेंट आहेत, सगळ्याच जन्मजात पराक्रमी...
यांच्या सर्वांच्या युद्धगर्जना 
*********battel cry,किंवा war cry*************

अतिशय सुंदर आणि आत्मिक शक्ती जागृत करणाऱ्या आहेत...
पंजाब रेजिमेंटची युद्धगर्जना 
"जो बोले सौ निहाल । सत श्री अकाल । " अशी आहे.
नागा रेजिमेंटची युद्धगर्जना 
"जय दुर्गा नागा" अशी आहे.
जाट रेजिमेंटची युद्धगर्जना 
"जाट बलवान, जय भगवान" आहे.
डोग्रा रेजिमेंटची युद्धगर्जना 
"ज्वाला माता कि जय" अशी आहे.
तर, 
बिहार रेजिमेंटची 
"जय बजरंगबली" अशी आहे.
सगळ्या युद्धगर्जना त्यांच्या-त्यांच्या देवांच्या नावाने आहेत...
पण, यामध्ये दोन रेजिमेंटच्या युद्धगर्जना थोड्या वेगळ्या आहेत,
त्यांच्या युद्धगर्जना अतिशय मनाला भावतात, त्या दोन रेजिमेंट म्हणजे.. 
"महार रेजिमेंट आणि 
 मराठा लाइट इन्फ्रंट्री....!"
महार रेजिमेंटची युद्धगर्जना, 
"बोलो भारत माता की जय" 
अशी आहे...
देशाचं नाव असलेली ही एकमेव युद्धगर्जना......
तर मराठा लाइट इन्फंट्रीची युद्धगर्जना 
"बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...!!" 
अशी जबरदस्त आहे...
ही एकमेव युद्धगर्जना जी देवाच्या नावाने नसून एका राजाच्या, 
एका महापुरूषाच्या नावाने आहे...
मराठा लाईट इन्फ्रंट्रीची युद्धगर्जना 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' ही कधीपासुन दिली जाऊ लागली हे पाहणे सुध्दा रंजक ठरेल. 👍
इ.स. १९४१ साली दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेत आत्ताच्या इथियोपियाच्या म्हणजे त्याकाळच्या ॲबेसिनीयाच्या उत्तरेस एक छोटासा देश होता त्याचं नाव इरेट्रिया. या इरेट्रियात एक केरेन नावाचा प्रांत आहे. या प्रांतात उंच उंच अशा डोंगर रांगा आहेत. या डोंगर रांगेवर एक किल्ला इटालियन सैनिकांच्या ताब्यात होता त्याचं नाव "डोलोगोरोडाँक". हा किल्ला जिंकून घेण्यासाठी ब्रिटिशांतर्फे मराठा रेजिमेंट लढत होती. बराच प्रयत्न करून सुद्धा हा किल्ला त्यांच्या ताब्यात येत नव्हता. परंतु या मराठा रेजिमेंटमध्ये 'श्रीरंग लावंड' नावाचे एक सुभेदार होते त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं आम्हांला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची परवानगी द्या. आम्ही हा किल्ला तुम्हाला जिंकून दाखवतो. पण ब्रिटिश ही परवानगी देण्यासाठी घाबरत होते कारण महाराजांचं नाव घेऊन यांनी बंदुका आपल्यावरच रोखल्या तर ? पण त्यांना किल्ला घेण्याशी मतलब असल्यामुळं त्यांच्या स्वार्थापोटी नाईलाजाने त्यांनी ही परवानगी दिली.
नंतर आपल्या लोकांनी .. 
 'बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय' 
म्हणत एका रात्रीत किल्ला सर केला. 
आणि त्यानंतर मराठा लाइट इन्फ्रंट्रीने ही battlecry म्हणजे युद्धगर्जना अधिकृत केली.
या युद्धगर्जनेमुळे केवळ सह्याद्रीतच नव्हे तर जगाच्या पाठीवर कोठेही प्रेरणा मिळाल्याशिवाय रहात नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते