मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कालठण नं.१ ता. इंदापूर येथे औट घटकेचा राजा ठरलेला नवसाचा श्रीयाळ सेठ उत्सव धुमधडाक्यात

 इंदापूर:- नितीन क्षीरसागर यांच्या कडुन कालठण क्रमांक एक ता. इंदापूर येथे औट घटकेचा राजा ठरलेला नवसाचा श्रीयाळ सेठ उत्सव श्री जगन्नाथ क्षीरसागर व लक्ष्मीबाई क्षीरसागर यांच्या निवासस्थानी तर मानाचा श्रीयाळ सेठ उत्सव श्री.देवीदास पाटील यांच्या घरी धार्मिक परंपरा कायम ठेवत 60 वे वर्षी साजरा केला.माजी सरपंच अर्जुन कुंभार व महादेव कुंभार यांनी तयार केलेल्या श्रीयाळ सेठ उत्सव मिरवणूक मान प्रथेप्रमाणे श्री बाळासाहेब मांढरे यांना मिळाला. भाविकांनी दर्शन घेऊन नवस पूर्ण करत इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे अशी प्रार्थना केली.कै लक्ष्मीबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या हळदीकुंकू पानसुपारी श्रीयाळ सेठ उत्सव गीत फुगडी  आदी सामाजिक उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागपंचमी निमित्त नाभिक समाजाच्या वतीने नागोबाची  प्रतीमा केली.या सामाजिक उपक्रमांचे आयोजन श्री तुकाराम पांडुळे हनुमंत पांडुळे साहेबराव पांडुळे संतोष पांडुळे यांनी केले.  श्रीयाळ सेठ उत्सवावेळी श्री.पोपट कोळेकर, संजय माने, हरीचंद्र गटकुळ, प्रा सतीश शिंदे, हनुमंत जाधव , हनुमंत पाटी...

श्रावणमास निमित्त विरशैव लिंगायतसमाज कैलास भूमीत विविधप्रकारच्या २५ झाडांचे वृक्षारोपण .

 इंदापूर दि . ३० जुलै बुधवार २०२५ रोजी विरशैव लिंगायत समाज कैलास भुमी येथे श्रावणमास निमित्त विविध प्रकारच्या २५ देशी वृक्षांचे दुपारी ३:३० वाजता यशवंत नगर, शहा रोड येथे वृक्ष संजिवनी परिवार व विरशैव लिंगायत समाज यांचे वतीने वृक्षारोपण करण्यात आले.  यावेळी विरशैव लिंगायत समाजाचे गुरु राचलिंग स्वामी ,श्री गजानन निलाखे , प्रा.कृष्णा ताटे,माजी नगरसेवक श्री अतुल कुमार ढोले,श्री नागेश भंडारी,श्री महेश भिंगे प्रा . सदाशिव उंबरदंड हमीद आत्तार, चंद्रकांत देवकर, अशोक अनपट, अशोक चिंचकर, पतंजली योग समितीचे प्रशांत गिड्डे .श्री सुनील भंडारी, अशोक खेडकर भारत बोराटे, वृक्ष संजिवनी परिवाराच्या संयोजिका सायरा आत्तार , रश्मी निलाखे, सविता निलाखे, अंजु ढोले, सुलभा टाकणखार, स्वाती भंडारी इ . विरशैव लिंगायत समाज बांधव व महिला भगीनी मोठया प्रमाणात उपस्थित होते,

योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप मध्ये इंदापूरच्या प्रशांत गिड्डे यांना सुवर्ण पदक.

इंदापूर, डॉ. संदेश शहा.याज कडून  क्रिडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार, इंडियन ऑलिंपिकशी संलग्न योगासन भारत, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि बृहन महाराष्ट्र योग परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या पुणे जिल्हा स्तर योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये इंदापूर पतंजलीचे योग शिक्षक प्रशांत गिड्डे यांनी दोन विविध स्पर्धां मध्ये सुवर्ण आणि कांस्य पदक जाते जिंकून इंदापूरचा मानसन्मान उंचावला. त्यांची आगामी राज्यस्तरीय योग स्पर्धेसाठी निवड झाली असून राज्याचे क्रीडा, युवक कल्याण व अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ध्रुव ग्लोबल स्कूल, उंड्री, पुणे येथे दिनांक २६ व २७ जुलै रोजी या स्पर्धा संपन्न झाल्या. मुले आणि मुली यांच्या वयोगटानुसार सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनिअर गटात विभागलेल्या या स्पर्धा एकूण दहा इव्हेंटमध्ये पार पडल्या. योगासन स्पर्धेत ग्रामीण, शहरी विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग वाढावा, खेलो इंडिया, ऑलिम्पिक साठी खेळाडू तयार व्हावेत तसेच सर्वत्र मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठ...

*इंदापूरच्या आश्रमशाळेच्या कु. प्रिती सुरेश विटकरला मिळाली "इस्रो" भेटीची संधी.*

इंदापूर ता.२९ : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या खाजगी विजाभज प्रवर्गाच्या उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना इस्रो ( भारतीय अंतराळ संशोधन (संस्था)या संस्थेस भेट देण्यासाठी पुणे विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी एका ठिकाणी चाचणी परीक्षा (दि.२७) घेण्यात आल्या. पुणे जिल्ह्यात मुखई ता.शिरुर येथे घेण्यात आलेल्या चाचणी परीक्षेत मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अंकित असणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर निवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळेची कु. प्रीती सुरेश विटकर (अकरावी विज्ञान) ही उत्तीर्ण झाली.पुणे विभागाच्या गुणवत्ता यादीत निवड झाल्याने तिची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे. शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला (काकी) मखरे, सचिव ॲड. समीर मखरे व प्राचार्या अनिता साळवे यांनी कु. प्रिती विटकरचे अभिनंदन करुन इस्रो या संस्थेस भेटीसाठी शुभेच्छा दिल्या. कु.प्रिती विटकरचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

पत्रकार संघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी राजेंद्र बोंद्रे

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ सामाजिक चळवळीचे प्रणेते तसेच ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बाबुराव बोंद्रे यांची भारतीय पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष एम एस शेख यांच्या अनुमतीने तसेच लिगल विंगचे प्रदेश अध्यक्ष कैलास पठारे यांच्या सहमतीने व प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांच्या आदेशाने तसेच पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष रमेश गणगे पाटील व सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीपकुमार जाधव यांच्या शिफारशीने वरिष्ठ पत्रकार राजेंद्र बोंद्रे यांची सातारा जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  यावेळी भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ यांच्या हस्ते राजेंद्र बोंद्रे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.तर त्यांच्या निवडीबद्दल पत्रकारिता क्षेत्रासह शासकीय प्रशासकीय सामाजिक राजकीय तसेच शिक्षण क्षेत्रातून देखील शुभेच्छांचा वर्षाव केला जात असताना पत्रकार संघाचे सातारा जिल्ह्यध्यक्ष संदीपकुमार जाधव यांसह ...

*पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे*

  मुंबई, दि. २९:- पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड), राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत), तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने रुंदीकरण करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे महानगर आणि औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड) – सध्या ४ लेन असलेला हा रस्ता ६ लेनमध्ये रुपांतर करावा, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत) – विद्यमान ४ लेन रस्त्याचे ६ लेनमध्ये रूपांतर करावा, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) – सध्या २ लेन असलेला मार्ग ४ लेन करण्याची आवश्यकता आहे. या तिन्ही मार्गांवर शिक्षण संस्था, औद्योगिक पट्टा, वसाहती, रुग्णालये, पेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसेच व्याप...

नातेपुते पोलिसांकडून लाखोंचा ऐवज तक्रारदारांच्या स्वाधीन

वाल्हे प्रतिनिधी-(सिकंदर नदाफ यांजकडून) चोरीला गेलेला ऐवज परत मिळेलच याची शाश्वती नसते ,मात्र अशक्य अशी कामगिरी नातेपुते (ता. माळशिरस) पोलिसांनी करून दाखवली आहे. यावेळी पोलिसांनी चोरीस गेलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून १० लाख ८० हजारांचा मुद्देमाल तक्रारदारांच्या स्वाधीन केल्याने तक्रारदारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.  काही महिन्यांपूर्वी नातेपुते पोलीस ठाण्यामध्ये चोरीच्या वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या होत्या .याबाबत नातेपुते पोलिसांनी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसेच नारायण शिरगावकर आदी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणा राबवून वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने मिळून १०,८०,८००/-रुपयांचा मुद्देमाल तक्रारदार व मूळ मालकास परत केला आहे. यावेळी रोख रक्कम १,५०,००० तसेच १५ ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा लक्ष्मी हार व १७ ग्रॅम आणि १९.५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन यांसह ९.८० ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याचे बदाम तसेच २...

निरा भिमा कारखाना 6 लाख मे. टन ऊस गाळप करणार -भाग्यश्री पाटील

  कारखान्याचे मिल रोलरचे पूजन उत्साहात इंदापूर : प्रतिनिधी दि. 27/7/25                            शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी ऊस गळीत हंगाम सन 2025-26 साठी बसविण्यात येणाऱ्या मिल रोलरचे पूजन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि. 27) करण्यात आले.           नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना आगामी 25 व्या गळीत हंगामामध्ये 6 लाख मे. टन ऊसाचे गाळप करणार आहे. सदरचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली.          सध्या आगामी गळीत हंगामासाठी कारखान्यातील मशिनरीची कामे प्रगतीपथावर आहेत. आगामी गळीत हंगाम हा शासनाच्या धोरणानुसार वेळेवरती चालू होईल, याचे काटेकोर नियोजन करण्यात आलेले ...

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व खाऊ वाटप- नितीन दादा शिंदे

इंदापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. शिवसेना पक्षाचे कार्यध्यक्ष झाल्यापासून उद्धव ठाकरे यांची राजकिय कारकिर्द ही संघर्षाचीच राहीली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षाला सत्ताधारी पक्ष बनवण्यात त्यांनी यश तर मिळवलंच, पण त्यांच्याच कारकिर्दीत शिवसेना पक्ष दूभंगला आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी त्यांना आता संघर्षही करावा लागतोय.उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यध्यक्ष झाल्यावर त्यांनी शिवसेना पक्षाला एक शिस्त लावली. पक्षाची बांधणी कॉर्पोरेट पद्धतीने केली. चाळ प्रमुख, इमारत प्रमुख आणि गट प्रमुख ते शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि विभागिय नेते अशी तळागाळातली मजबूत संघटना बांधली. त्याचा परीणाम निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयी होऊन लोकप्रतिनिधी बनले.. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात  रुग्णांना फळे व खाव वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे, शहरप्रमुख महादेव सोमवंशी, तालुका समन्वयक आरुण ...

*विविध उपक्रमांतून इंदापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस साजरा.*

 इंदापूर:- महाराष्ट्र राज्याचे तरुण तडफदार व कृतिशील नेतृत्व म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राधिका रेसिडेन्सी क्लब इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराच्या निमित्ताने तालुक्यातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी तब्बल ४८० रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. नागरिकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र प्रमुखाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही स्वयंप्रेरणेतून रक्तदान करण्यास इथवर आलो आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी राधिका रेसिडेन्सी क्लब येथे आलेल्या रक्तदात्यांनी दिली.  यासह इंदापूर येथील श्रावण बाळ अनाथाश्रम शाळा या ठिकाणी देखील श्री प्रवीण माने यांनी गरजू शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे फळांचे व सोनाई दूध चे वाटप केले व येथे विद्यार्थ्यांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केकही कापला तसेच माने यांनी तो सर्व विद्यार्थ्यांना आवर्जून भरवला.  तसेच इंदापूर येथील श्री समर्थ...

श्रीमती सायरा हमीद आत्तार यांना पर्यावरण सेवा पुरस्कार प्रदान .

इंदापूरः-  इंदापूर :- माऊली हरित अभियान व बायोस्पिअर संस्थेच्या वतीने ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठ गमन सोहळ्याचे औचित्य साधून पालखी सोहळा पहिल्यांदाच श्री क्षेत्र आळंदीत माऊलींच्या भेटीला येत असल्याचा सुवर्ण योगावर जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी तळावरती अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ नांदृकवृक्ष यांचे रोपण करण्यात आले याप्रसंगी बोलताना माऊली हरित अभियानाचे प्रमुख डॉ .सचिन पुणेकर म्हणाले की वृक्ष संजीवनी परिवाराने गेल्या चार वर्षापासून वृक्षारोपण केले आहे त्यांच्या कामाची दखल घेऊन, माऊली हरित व बायोस्फियर संस्था यांच्या वतीने पारितोषिक देत आहोत तसेच गेली दहा वर्षे पालखीतील वारकऱ्यांची चरण सेवा करणाऱ्या जय इन्स्टिट्यूट ऑफ नरसिंह प्रमुख लताताई नायकुडे आणि त्यांच्या 300 पेक्षा अधिक मुलींनी सेवा केली, संस्थेच्या वतीने त्यांचाही नागरी सन्मान करण्यात आला आहे, दत्तात्रय गायकवाड आणि शैलेंद्र पटेल यांचीही भाषणे झाली . या कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम मंदिर येथील मंदिरामधून सदर रोपांची पालखीमध्ये बैठक करून...

स्वच्छ सवर्क्षसर्वे स्पर्धेत इंदापूर नगरपरिषदेचा राज्यात प्रथम क्रमांक, नगर परिषदेचा नव्हे तर संपूर्ण इंदापूर शहराच्या नागरिकांचा विशेष सन्मान- रमेश ढगे

इंदापूर शहराची छोट्या शहरांत (20 ते 50 हजार लोकसंख्येच्या गटात)  तसेच 1581 शहरामध्ये आज अखेरची उच्चतम कामगिरी करून देशात पाचवा व राज्यात प्रथम क्रमांकावर झेप घेतली कचरा मुक्त शहर मानांकनामधील  थ्री स्टार मानांकन,  तसेच ओ डी एफ + + मनांकन प्राप्त झाले. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये घरोघरी कचरा संकलन, कचरा विलगीकरण, कचरा प्रक्रिया कचरा तक्रारींचे निवारण सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता व्यावसायिक रहिवासी व मार्केट क्षेत्र स्वच्छता, जल स्तोत्र व सार्वजनिक शौचालय स्वच्छता तसेच स्वच्छता ही सेवा कोंढाळमुक्त रस्ते व ब्लॅक स्पॉट सुशोभीकरण आदींचा समावेश झाला आहे. इंदापूर शहराची स्वच्छ  सर्वेक्षण स्पर्धेमध्ये मध्ये आज अखेरची सर्वोत्तम  कामगिरी आहे. याप्रसंगी कर्मचाऱ्यांनी फटाके वाजून एकमेकांना पेढे वाटून  जल्लोष साजरा केला. यावेळी मार्गदर्शन करताना इंदापूर नगर परिषदेचे  मुख्याधिकारी श्री रमेश ढगे यांनी कर्मचाऱ्यांचे गुणगौरव करून असे सांगितले की हा सन्मान फक्त इंदापूर नगर परिषदेचा नव्हे तर संपूर्ण इंदापूर शहराच्या नागरिकांचा  विशेष  सन्मान आहे.आपल्या श...

मा.रत्नाकर तात्यांच्या आश्रमशाळेत अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन*

इंदापूर ता.१८: साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना ५६ व्या स्मृतिदिनानिमित्त भिमाई आश्रमशाळेत अभिवादन करण्यात आले. यावेळी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात संस्थेचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते ॲड.राहुल मखरे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला पुष्पहार तर तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस व माजी नगराध्यक्ष, संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वैष्णवी गायकवाड, श्रेया पाटील या विद्यार्थींनींची भाषणं झाली. तसेच शिक्षिका मनिषा जगताप - मखरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आपल्या मनोगतातून उजाळा दिला. यावेळी संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे,मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे,उपप्राचार्या सविता गोफणे, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा यांचे दि. १६ जुलै २०२५ आमरण उपोषण, होमिओपॅथिक डॉक्टरांचा उपोषणास पाठिंबा.

इंदापूर, डॉ. संदेश शहा. महाराष्ट्र राज्यातील सीसीएमपी ( सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मोकोलॉजी ) उत्तीर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यक परिषदे तील नोंदणी बाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने खोटया व अर्धसत्य माहितीच्या आधारावर मिडिया, आंदोलने, मोर्चे यामधून सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांच्या स्वााभिमानाला ठेच लागेल अशा प्रकारची वक्तव्ये करत राज्य शासन व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर दबाव आणला आहे. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा हे दि. १६ जुलै २०२५ रोजी सकाळी अकरा वाजे पासून मुंबई आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्याने त्यासाठी रीतसर परवानगी दिली आहे. त्यांच्या उपोषणाच्या निर्णयामुळे होमिओपॅथिक डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली असून त्यांना राज्यातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टर संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सीसीएम पी होमिओपॅथिक डॉक्टर्स व आयएमए संघटनेत संघर्ष अटळ आहे. मात्र दोन्ही संघटनाच्या डॉक्टरांची नागरिकांना गरज असून त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून जनतेस वेठीस न धरता मक्तेदारीला ...

12 किल्ले जागतिक वारसा नोंद इतिहास साक्ष (युनेस्को)

मुंबई प्रतिनीधी:  (सतिश वि.पाटील) भारतीय पुरातत्व विभागाच्या साहाय्याने या गड किल्ल्यांना अधिक चांगले रुप देऊन सर्वांना प्रेरणा देणारा इतिहास प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सर्वांच्या सहकार्य आणि समन्वयातून निश्चितपणे जागतिक वारसा स्थळांमध्ये याचा समावेश होईल, असे नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गड किल्ल्यांचे पावित्र्य जपले जावे, यासाठी तेथे मद्यपान करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा राज्य शासन लवकरच आणणार असल्याची माहिती दिली. जागतिक वारसा केंद्र समितीच्या ४६ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष शर्मा यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. जागतिक वारसा यादीत नोंद ही मोठी गोष्ट आहे. प्रत्येक देश हे जागतिक पातळीवर त्यांच्या देशातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे अधिक सकारात्मक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे हे किल्ले आणि तेथील इतिहास हा युनेस्कोच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचला पाहिजे. येथील गडकिल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे येथील नागरिकांची भावना ही त्याच्याशी जोडली गेली आहे. जगात इतरत्र कुठे असे पाहायला मिळत नाही. त...

वाल्हेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

वाल्हे प्रतिनिधी -सिकंदर नदाफ  परमपूज्य सदगुरूं व महर्षी वाल्मीकी वारकरी सेवा संघाचे संस्थापक ह. भ. प. अशोक महाराज पवार यांनी अनुग्रह दिलेल्या वाल्हे सह पंचक्रोशीतील शिष्यगणांकडून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिष्यगणांकडून वाल्हे (ता. पुरंदर) गावच्या पालखी तळानजीक विठोबा मैदानात उभारलेल्या महर्षी वाल्मीकी वारकरी सेवा संघाच्या भक्तनिवासात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भजन कीर्तन आणि प्रवचनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक शिष्यगणांनी आपल्याला ज्या सदगुरूंनी मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखविला आणि जीवन कसे जगावे हे शिकवले अशा सदगुरूं व मठाधिपती ह. भ. प. अशोक महाराज पवार यांचे पाद्यपूजन करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले या प्रसंगी सोनबा बनकर मारुती पोटे दत्तात्रेय पवार शुभम दुर्गाडे पांडुरंग पवार गजानन पवार बंडासाहेब दाते मनीषा पवार कमल पवार सुनंदा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना पण हे आश्वासन हवेतच विरले,

इंदापूर:- वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या, वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावर पुन्हा मेघडंबरीसह समाधी उभारण्यात यावी अशी सूचना प्रशासनाला दिल्याचे असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भ्रमणध्वनीवरून दिली.  त्यानंतर आ. गोपीचंद पडळकर, सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गलांडवाडी पाटीवर तब्बल अडीच तास केलेले रास्ता रोको आंदोलन सकल हिंदू समाजाने स्थगित केले. वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील अतिक्रमण काढण्यात यावीत या मागणीसाठी व महामार्गाचे रुंदीकरण, उड्डाणपूलाच्या बांधकामामुळे वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आ.गोपीचंद पडळकर, सागर बेग व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महामार्गावरील गलांडवाडी पाटी येथे आज सकाळी साडेअकरा वाजता रास्ता रोको करण्यात आला. पडळकर म्हणाले, विशाळगड, प्रतापगड गडाच्या धर्तीवर वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील सर्वच्या सर्व अतिक्रमण काढली ज...

दिवंगत रत्नाकर(तात्या) मखरे यांच्या जन्मदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त *जीवनपट*

 इंदापूर नेतृत्व आणि वक्तृत्वाचा मिलाफ म्हणजेच तात्या. जाती धर्म बाजूला सारून केवळ माणसाला माणूस म्हणून बघून कार्य करणारे व्यक्ती बोटावर मोजण्याइतके असतात. आजच्या राजकारणात आणि समाजकारणात धर्मांध आणि जातंध्यांची चलती आहे.मात्र शिव, फुले,शाहू, आंबेडकरी विचारांची कास धरून सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रभावी वाटचाल करणारे व्यक्ती म्हणजे तात्या. त्यांची विशेष ओळख म्हणजे राजकारणा पलीकडे पाहणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच राहिली. अनेक वर्षापासून नानाविध अध्यायांचा इतिहास,हृदय आणि श्वासांच्या नात्याइतका एकरुपतेने सामावला गेला आहे. तात्यांची राजकीय जीवनाची सुरुवात खऱ्या अर्थाने सन- १९७४ पासून इंदापूर नगरपालिकेत नगरसेवक निवडीने झाली.१२ डिसेंबर १९९० ला नगरसेवकांमधून नगराध्यक्षपदी तात्यांची निवड झाली. नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विधायक योजना राबविल्या. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्ध पुतळे नगरपालिका मैदानात बसविले . रोजंदारीवरील ३८ कामगारांना न्यायालयाच्या माध्यमातून कायम केले. पालिके शेजारी जि. प.शाळेला नवीन खोल्या बांधल्या. उद्योग धंद्यासा...

राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा मोहरमचा उत्सव – जगताप

वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ त्याग श्रद्धा आणि आत्मचिंतनासह शांततेचा संदेश देत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा मोहरमचा उत्सव हा सर्वत्र मानला जातो. त्यामुळे या उत्सवादरम्यान कायद्याचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा वाल्हे ( ता.पुरंदर ) पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप यांनी दिला . मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाल्हे पोलीस दूरक्षेत्रात शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक जगताप हे बोलत होते.या दरम्यान मुस्लीम समाजातर्फे त्यांचा व हवालदार प्रशांत पवार यांचा देखील सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुस्लीम समाजाचे मौलाना सिकंदर इनामदार चांद शेख असलम नदाफ मलिक इनामदार आदम इनामदार वासिम इनामदार विजय पवार यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थितांचे आभार सिकंदर नदाफ यांनी मानले.

*श्री दत्तात्रय अनपट यांचा आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिलेले अभिनंदनाचे पत्र देऊन येतोचित सत्कार समारंभ*

इंदापूर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनने मागील 21 वर्षापासून अविरतपणे निशुल्क योग प्राणायामाच्या माध्यमातून असंख्य व्याधीग्रस्त रुग्णांना निरोगी केल्याबद्दल त्यांच्या या अनोख्या कार्याची दखल घेऊन सन 2025 करिता श्री दत्तात्रय अनपट यांना दिनांक 22 जून रोजी *योगरत्न* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे आज त्यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मा.खा. सुप्रियाताई सुळे यांचे विशेष अभिनंदनाचे पत्र देऊन आज सकाळी स्थायी वर्गामध्ये येऊन संबंधित पक्षाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य मा श्री अमोल भिसे यांनी केला , यावेळी बहुसंख्येने पुरुष व महिला साधक उपस्थित होते, याप्रसंगी श्री भिसे म्हणाले की श्री दत्तात्रय अनपट यांचं कार्य खरंच वाखाणण्याजोगं आहे त्यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांना माहिती समजली असता त्यांनी या अविरत चालू ठेवलेल्या कार्याबद्दल विशेष असे अभिनंदनाचे पत्र दिले , विशेषता ग्रामीण भागात अशा प्रकारची निशुल्क सेवा चालू ठेवणं हे सोपं काम नाही परंतु पतंजली परिवार हा श्री दत्तात्रय अनपट ...

वाल्हेत जमिनीच्या वादातून दोन जणांवर कोयत्याने हल्ला

वाल्हे प्रतिनिधी ; सिकंदर नदाफ पुरंदर तालुक्यात नेहमीच चर्चेत असलेल्या वाल्हे येथील वरच्या मळ्यात जमिनीच्या जुन्या वादातून दोन जणांवर कोयत्याने हल्ला झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.   याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामचंद्र पांडुरंग भुजबळ रा.वाल्हे ( वरचा मळा ) यांनी त्यांच्या मळ्यात जाण्यासाठी पाणंद रस्ता नुकताच मंजूर करून घेतला होता.परंतु या रस्त्यासाठी रामचंद्र भुजबळ व गणेश जगन्नाथ भुजबळ यांच्यात जमिनीच्या मालकी हक्कावरून पूर्वीपासूनच वाद होता . मात्र जुन्या वादाचा राग मनात धरून गणेश भुजबळ याने याच पाणंद रस्त्यावर दि.२३ जून रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान ट्रॅक्टर आडवा लावून रामचंद्र भुजबळ यांचा रस्ता अडवला.त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने रामचंद्र भुजबळ यांच्यावर वार करण्यास सुरवात केली.यावेळी ओंकार अरविंद पवार ( रा.आडाचीवाडी ) हे भांडणे सोडविण्यास गेले असता गणेश भुजबळ याने त्यांच्यावरही कोयत्याने वार केले व रामचंद्र भुजबळ यांचा मुलगा श्रेयश भुजबळ याला देखील मारहाण केली.या घटनेत रामचंद्र भुजबळ व ओंकार पवार...

तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने चहा वाटप अंदाजे 2000 चहा चे वाटप- अध्यक्षा सौ.अनिताताई खरात

 इंदापूर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाविक भक्तांना इंदापूर येथे आगमना दिवशी तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने चहा वाटप करण्यात आले. गेले पाच ते सहा वर्षांपासून तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने दरवर्षी भाविकांना कधी पोहे,केळी ,चहा बिस्किट ,उपमा ,पाणी बॉटल अशी वेगवेगळ्या प्रकारचे भाविकांच्या सेवेसाठी वाटप करण्यात येते यावेळी तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून चहा वाटप करण्यात आले अंदाजे 2000 चहा चे वाटप यावेळी करण्यात आले . अनिताताई खरात म्हणाल्या की मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानते, कारण तेजपृथ्वी ग्रुपचे सर्वच पदाधिकारी अतिशय मनोभावाने प्रत्येक वर्षी वारकऱ्यांच्या सेवेसाठी काहीतरी उपक्रम करत असतात त्याचा मला अभिमान आहे.तसेच यावर्षी त्यांनी चहाचे वाटप केले . यावेळी सद्दाम भाई बागवान, आबा ठावरे, लक्ष्मण वाघमोडे, शंकर उबाळे, विशाल म्हेत्रे, संदीप रेडके,पृथ्वीराज खरात,नागेश मारकड, मयुर बिचकुले,रुपेश वाघमोडे, इत्यादी उपस्थित होते. या वेळी खरात म्हणाल्या की मी प्रशासनालाही विनंती करते की बऱ्याच ठिकाणी वारकऱ्यांच्या सोईसाठी जे पाण्याचे टॅंक...

वाल्हे नजीक रेल्वे रुळावर आढळला मृतदेह

वाल्हे प्रतिनिधी :सिकंदर नदाफ वाल्हे ( ता.पुरंदर ) ते दौंडज दरम्यान रेल्वेच्या पोल क्र.६९ /२६ जवळील रेल्वे रुळावर मंगळवारी (दि.१ जुलै) सायंकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मिरजकडे निघालेल्या हमसफर एक्सप्रेसचे लोकोपायलट सुमन कुमार यांना मंगळवारी सायंकाळी ८ च्या सुमारास वाल्हे हद्दीतील रेल्वेच्या पोल क्र.६९/२६ जवळील रेल्वे रुळावर अज्ञात व्यक्तीचा रेल्वे अपघात झाल्याचे निदर्शनास आले होते. यावेळी घटनेची माहिती मिळाल्यावर वाल्हे पोलीस चौकीचे हवालदार प्रशांत पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली .त्या ठिकाणी पोलिसांना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.या दरम्यान पंचनामा करताना मयत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ त्याची उंची साधारण ५ फुट ३ इंच रंग सावळा अंगात निळा शर्ट व काळ्या रंगाची हाफ पँट असल्याचे वर्णनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेची खबर ट्रॅकमन अमोल भुजबळ यांनी वाल्हे पोलीस चौकीला दिली आहे.तर या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्...

योगीराज श्री संतराज पालखी सोहळ्याच्या आगमनाने व श्री संत गुलाब बाबा पालखी प्रस्थानने रेडा नगरीला पंढरपुराचे स्वरूप

इंदापूर तालुक्यातील रेडा या गावातून श्री संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठीक चार वाजून बत्तीस मिनिटांनी (दि.३०) जून रोजी झाले. रेडा पंचक्रोशीतील आणि महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध राज्यातून श्री संत गुलाब बाबा भक्तांचे पालखी प्रस्थान साठी आगमन झाले होते.  त्याच बरोबर गेले ५८ वर्ष योगीराज संतराज पालखी सोहळा रेडा गावी मुक्कामी येत असतो. एका पालखी सोहळ्याचे प्रस्थान आणि दुसऱ्या पालखी सोहळ्याचा आगमन यामुळे रेडा गावाला पंढरपूरचे स्वरूप आले होते.  दोन संतांच्या भेटीचा अनुभव हाजारो वारकऱ्यांनी ह्याची देही ह्याची डोळा घेतल्याचा चेहऱ्यावर प्रत्येकाच्या भाव दिसत होता. श्री संत गुलाबबाबा मंदिरातून श्री संत गुलाब बाबा पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले आणि योगीराज संतराज महाराज पालखी सोहळा रेडा गावी आगमन होताच रेडा ग्रामस्थांच्या वतीने तोफांची सलामी देऊन स्वागत करण्यात आले.  रेडा गावाच्या वतीने योगीराज संतराज पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले आणि श्री संत गुलाब बाबा पालखी सोहळा जंगी प्रस्थान करण्यात आले. दोन्ही पालखी सोहळ्याच्या भेटीचा क्षण हजारो वारकऱ्यांनी ...

टेंभुर्णी येथे आषाढी वारी निमित्त पंढरपुर कडे जाणाऱ्या भाविकांना मोफत चहा नाष्टा व पाणी वाटप

टेंभूर्णी:- वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते.वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते. सोलापूर जिल्ह्य़ातील टेंभुर्णी येथे आषाढी वारी निमित्त पंढरपुर कडे जाणाऱ्या भाविकांना मोफत चहा नाष्टा व पाणी वाटप.करण्यात आला. महालक्ष्मी गारमेंट्स चे मालक महादेव शेठ जमदाडे यांच्या तर्फे सालाबादप्रमाणे हा उपक्रम राबवण्यात आला  त्यांचे सर्व सहकारी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैभव भैय्या महाडिक, अक्षय भाऊ ढवळे पै. आप्पा महाडिक, विठ्ठल महाडिक (चेअरमन) गोकुळ तात्या कोकरे, किशोर कडाळे, हनुमंत जमदाडे, महावीर ...

नामा ऍग्री इनपुट मनुफॅक्चरर्स ऑफ इंडिया कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांन मार्फत संत तुकाराम महाराजांची सेवा

 इंदापूर:- नामा ऍग्री इनपुट मनुफॅक्चरर्स ऑफ इंडिया कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी संत तुकाराम महाराज यांची सेवा गेली चार वर्षापासून कार्यरत आहे,हे असोशियन कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कंपन्या आणि विविध विक्रेत्या यांचे एक विशाल संघटन आहे हे संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यात हे काम करते या सोबतच सामाजिक सलोखा संभाळत विविध सामाजिक कार्यात देखील सक्रिय असते जेव्हा संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती मुक्कामी येथे तेव्हा वारी मधील सर्व माऊलींची सेवा करण्याचे वारकऱ्यांना जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप व फराळाचे वाटप व स्वच्छता विविध उपक्रम व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम ही संघटना करते मागील चार वर्षापासून सतत कार्यरत आहे यावेळी उपस्थित संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष दिलीप घोडके, सचिव नितीन आटोळे,डायरेक्टर रामदास चव्हाण ,सागर पार्लेकर, दादासाहेब करे ,कुमार काकडे, नवनाथ हगारे ,शेलार साहेब, विजय कदम ,डी.व्ही शिंदे, किशोर गर्जे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते