त्याग श्रद्धा आणि आत्मचिंतनासह शांततेचा संदेश देत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा मोहरमचा उत्सव हा सर्वत्र मानला जातो. त्यामुळे या उत्सवादरम्यान कायद्याचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा वाल्हे ( ता.पुरंदर ) पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप यांनी दिला .
मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाल्हे पोलीस दूरक्षेत्रात शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक जगताप हे बोलत होते.या दरम्यान मुस्लीम समाजातर्फे त्यांचा व हवालदार प्रशांत पवार यांचा देखील सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मुस्लीम समाजाचे मौलाना सिकंदर इनामदार चांद शेख असलम नदाफ मलिक इनामदार आदम इनामदार वासिम इनामदार विजय पवार यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थितांचे आभार सिकंदर नदाफ यांनी मानले.
टिप्पण्या