वाल्हे प्रतिनिधी -सिकंदर नदाफ
परमपूज्य सदगुरूं व महर्षी वाल्मीकी वारकरी सेवा संघाचे संस्थापक ह. भ. प. अशोक महाराज पवार यांनी अनुग्रह दिलेल्या वाल्हे सह पंचक्रोशीतील शिष्यगणांकडून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शिष्यगणांकडून वाल्हे (ता. पुरंदर) गावच्या पालखी तळानजीक विठोबा मैदानात उभारलेल्या महर्षी वाल्मीकी वारकरी सेवा संघाच्या भक्तनिवासात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भजन कीर्तन आणि प्रवचनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अनेक शिष्यगणांनी आपल्याला ज्या सदगुरूंनी मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखविला आणि जीवन कसे जगावे हे शिकवले अशा सदगुरूं व मठाधिपती ह. भ. प. अशोक महाराज पवार यांचे पाद्यपूजन करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले
या प्रसंगी सोनबा बनकर मारुती पोटे दत्तात्रेय पवार शुभम दुर्गाडे पांडुरंग पवार गजानन पवार बंडासाहेब दाते मनीषा पवार कमल पवार सुनंदा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या