शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व खाऊ वाटप- नितीन दादा शिंदे
इंदापूर
: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. शिवसेना पक्षाचे कार्यध्यक्ष झाल्यापासून उद्धव ठाकरे यांची राजकिय कारकिर्द ही संघर्षाचीच राहीली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षाला सत्ताधारी पक्ष बनवण्यात त्यांनी यश तर मिळवलंच, पण त्यांच्याच कारकिर्दीत शिवसेना पक्ष दूभंगला आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी त्यांना आता संघर्षही करावा लागतोय.उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यध्यक्ष झाल्यावर त्यांनी शिवसेना पक्षाला एक शिस्त लावली. पक्षाची बांधणी कॉर्पोरेट पद्धतीने केली. चाळ प्रमुख, इमारत प्रमुख आणि गट प्रमुख ते शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि विभागिय नेते अशी तळागाळातली मजबूत संघटना बांधली. त्याचा परीणाम निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयी होऊन लोकप्रतिनिधी बनले.. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व खाव वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे, शहरप्रमुख महादेव सोमवंशी, तालुका समन्वयक आरुण पवार, उपशहरप्रमुख दादासाहेब देवकर, उपशहरप्रमुख संतोष क्षीरसागर, उपशहरप्रमुख बंडु शेवाळे, उपशहरप्रमुख प्रदिप पवार, युवासेना शहर अधिकारी अविनाश खंडाळे,उपशहरप्रमुख शकिल कुरेशी, उपविभाग प्रमुख ब्रम्हदेव थोरात , जेष्ठ शिवसैनिक गोरक कदम, शिवसैनिक देवा मगर, युवराज लोंढे,दादा शेळके आदी शिवसैनिक उपस्थित होते
टिप्पण्या