क्रिडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार, इंडियन ऑलिंपिकशी संलग्न योगासन भारत, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि बृहन महाराष्ट्र योग परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या पुणे जिल्हा स्तर योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये इंदापूर पतंजलीचे योग शिक्षक प्रशांत गिड्डे यांनी दोन विविध स्पर्धां मध्ये सुवर्ण आणि कांस्य पदक जाते जिंकून इंदापूरचा मानसन्मान उंचावला. त्यांची आगामी राज्यस्तरीय योग स्पर्धेसाठी निवड झाली असून राज्याचे क्रीडा, युवक कल्याण व अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ध्रुव ग्लोबल स्कूल, उंड्री, पुणे येथे दिनांक २६ व २७ जुलै रोजी या स्पर्धा संपन्न झाल्या. मुले आणि मुली यांच्या वयोगटानुसार सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनिअर गटात विभागलेल्या या स्पर्धा एकूण दहा इव्हेंटमध्ये पार पडल्या. योगासन स्पर्धेत ग्रामीण, शहरी विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग वाढावा, खेलो इंडिया, ऑलिम्पिक साठी खेळाडू तयार व्हावेत तसेच सर्वत्र मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी योगाचा प्रचार व्हाव्या यासाठी या स्पर्धा घेतल्या जातात.
प्रशांत गिड्डे यांनी सिनिअर गटात सुपाईन आणि ट्रडीशनल इव्हेंट मध्ये सुवर्ण पदक जिंकले असून त्यांची संगमनेर येथे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संदेश शहा,यांनी अभिनंदन केले.इंदापूर भारत स्वाभिमानचे अध्यक्ष जयकुमार शिंदे, पतंजलिचे अध्यक्ष मल्हारी घाडगे,हमीदभाई आत्तार, अनपट नाना, देवकर नाना,आणि सर्व योगसाधकांनी त्यांचे अभिनंदन केले.
टिप्पण्या