*श्री दत्तात्रय अनपट यांचा आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिलेले अभिनंदनाचे पत्र देऊन येतोचित सत्कार समारंभ*
इंदापूर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनने मागील 21 वर्षापासून अविरतपणे निशुल्क योग प्राणायामाच्या माध्यमातून असंख्य व्याधीग्रस्त रुग्णांना निरोगी केल्याबद्दल त्यांच्या या अनोख्या कार्याची दखल घेऊन सन 2025 करिता श्री दत्तात्रय अनपट यांना दिनांक 22 जून रोजी *योगरत्न* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे आज त्यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मा.खा. सुप्रियाताई सुळे यांचे विशेष अभिनंदनाचे पत्र देऊन आज सकाळी स्थायी वर्गामध्ये येऊन संबंधित पक्षाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य मा श्री अमोल भिसे यांनी केला, यावेळी बहुसंख्येने पुरुष व महिला साधक उपस्थित होते, याप्रसंगी श्री भिसे म्हणाले की श्री दत्तात्रय अनपट यांचं कार्य खरंच वाखाणण्याजोगं आहे त्यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांना माहिती समजली असता त्यांनी या अविरत चालू ठेवलेल्या कार्याबद्दल विशेष असे अभिनंदनाचे पत्र दिले , विशेषता ग्रामीण भागात अशा प्रकारची निशुल्क सेवा चालू ठेवणं हे सोपं काम नाही परंतु पतंजली परिवार हा श्री दत्तात्रय अनपट व श्री शहाजी बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली एक समाजसेवेचा वसा घेतलेला ब्रँड निर्माण झालेला असून त्यांच्या माध्यमातून विविध समाजातील असंख्य पुरुष व महिला साधक हे या कार्यात स्वतःला झोकून देत आहेत. सदर सेवा ही त्यांनी ऑनलाईन झूम ॲप वरसुद्धा ही योग सेवा मोफत चालू ठेवली आहे ही बाब इंदापूर करासाठी अत्यंत कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. इंदापूर नगरपालिकेच्या वतीने जे योग भवन चालू आहे त्याच्या कामाला गती मिळावी यासाठी मा श्री हर्षवर्धन पाटील व मा खा सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करू असे त्यांनी सर्वांना आश्वासित केले.
या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुधीर मखरे त्याचबरोबर सूत्रसंचालन श्री विलास गाढवे यांनी तर आभार प्रदर्शन श्री लहू गाढवे यांनी मानले.
टिप्पण्या