सामाजिक चळवळीचे प्रणेते तसेच ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बाबुराव बोंद्रे यांची भारतीय पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष एम एस शेख यांच्या अनुमतीने तसेच लिगल विंगचे प्रदेश अध्यक्ष कैलास पठारे यांच्या सहमतीने व प्रदेश संघटक अनिल सोनवणे यांच्या आदेशाने तसेच पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष रमेश गणगे पाटील व सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीपकुमार जाधव यांच्या शिफारशीने वरिष्ठ पत्रकार राजेंद्र बोंद्रे यांची सातारा जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ यांच्या हस्ते राजेंद्र बोंद्रे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.तर त्यांच्या निवडीबद्दल पत्रकारिता क्षेत्रासह शासकीय प्रशासकीय सामाजिक राजकीय तसेच शिक्षण क्षेत्रातून देखील शुभेच्छांचा वर्षाव केला जात असताना पत्रकार संघाचे सातारा जिल्ह्यध्यक्ष संदीपकुमार जाधव यांसह ॲड. संदीपजी कांबळे यांनी देखील राजेंद्र बोंद्रे यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला आहे.
टिप्पण्या