वाल्हे ( ता.पुरंदर ) ते दौंडज दरम्यान रेल्वेच्या पोल क्र.६९ /२६ जवळील रेल्वे रुळावर मंगळवारी (दि.१ जुलै) सायंकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मिरजकडे निघालेल्या हमसफर एक्सप्रेसचे लोकोपायलट सुमन कुमार यांना मंगळवारी सायंकाळी ८ च्या सुमारास वाल्हे हद्दीतील रेल्वेच्या पोल क्र.६९/२६ जवळील रेल्वे रुळावर अज्ञात व्यक्तीचा रेल्वे अपघात झाल्याचे निदर्शनास आले होते.
यावेळी घटनेची माहिती मिळाल्यावर वाल्हे पोलीस चौकीचे हवालदार प्रशांत पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली .त्या ठिकाणी पोलिसांना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.या दरम्यान पंचनामा करताना मयत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ त्याची उंची साधारण ५ फुट ३ इंच रंग सावळा अंगात निळा शर्ट व काळ्या रंगाची हाफ पँट असल्याचे वर्णनात नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची खबर ट्रॅकमन अमोल भुजबळ यांनी वाल्हे पोलीस चौकीला दिली आहे.तर या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक केशव जगताप हे करीत आहेत.
टिप्पण्या