इंदापूर:- नितीन क्षीरसागर यांच्या कडुन कालठण क्रमांक एक ता. इंदापूर येथे औट घटकेचा राजा ठरलेला नवसाचा श्रीयाळ सेठ उत्सव श्री जगन्नाथ क्षीरसागर व लक्ष्मीबाई क्षीरसागर यांच्या निवासस्थानी तर मानाचा श्रीयाळ सेठ उत्सव श्री.देवीदास पाटील यांच्या घरी धार्मिक परंपरा कायम ठेवत 60 वे वर्षी साजरा केला.माजी सरपंच अर्जुन कुंभार व महादेव कुंभार यांनी तयार केलेल्या श्रीयाळ सेठ उत्सव मिरवणूक मान प्रथेप्रमाणे श्री बाळासाहेब मांढरे यांना मिळाला. भाविकांनी दर्शन घेऊन नवस पूर्ण करत इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे अशी प्रार्थना केली.कै लक्ष्मीबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या हळदीकुंकू पानसुपारी श्रीयाळ सेठ उत्सव गीत फुगडी
आदी सामाजिक उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नागपंचमी निमित्त नाभिक समाजाच्या वतीने नागोबाची
प्रतीमा केली.या सामाजिक उपक्रमांचे आयोजन श्री तुकाराम पांडुळे हनुमंत पांडुळे साहेबराव पांडुळे संतोष पांडुळे यांनी केले.
श्रीयाळ सेठ उत्सवावेळी श्री.पोपट कोळेकर, संजय माने, हरीचंद्र गटकुळ, प्रा सतीश शिंदे, हनुमंत जाधव , हनुमंत पाटील,सचीन जाधव, दत्तात्रेय मदने, लालासाहेब पाडुळे, दादासाहेब गलांडे, अनिल चिंचकर, विजय जेडगे, तानाजी सपकळ, श्रीकांत पवार समीर मुलांनी, रमजान मुलांनी, भास्कर जगताप, प्रताप शेंडगे,भागवत गायकवाड , अण्णासाहेब धोत्रे, शंकर जावळे , सतीश घाडगे
आदी मान्यवर उपस्थित होते श्रीयाळ सेठ उत्सव यशस्वीतेसाठी प्रसाद पाटील,धनाजी पाटील, उत्तम पाटील,
वसंत पाटील यांच्या सह बाळासाहेब क्षीरसागर, दादासाहेब क्षीरसागर, संतोष क्षीरसागर यांनी प्रयत्न केले
प्रा.नितीन क्षीरसागर यांनी सणाचे महत्त्व सांगितले.
उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.
चौकट 1999ते 1408या काळात पर्जन्यमान कमी झाले यावेळी दखन भागात बारा वर्षे दुष्काळ पडला यावेळी जनतेच्या कल्याणासाठी शिवभक्त श्रीयाळ सेठ यांनी अन्नधान्य व संपत्ती जनतेला खुली केली .ही दानशूरता पाहुन आदीलशाहाने राजा केले. हर्षोल्लासमुळे औट घटकेत श्रीयाळसेठचा शेवट झाला मात्र या वेळी अनेक कामे मार्गी लागली म्हणून हा दिवस शुध्द श्रावण षष्ठी श्रीयाळ सेठ उत्सव साजरा करण्याची प्रथा आज ग्रामीण व शहरी भागात आजही चालू आहे.
टिप्पण्या