इंदापूर :- माऊली हरित अभियान व बायोस्पिअर संस्थेच्या वतीने ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठ गमन सोहळ्याचे औचित्य साधून पालखी सोहळा पहिल्यांदाच श्री क्षेत्र आळंदीत माऊलींच्या भेटीला येत असल्याचा सुवर्ण योगावर जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी तळावरती अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ नांदृकवृक्ष यांचे रोपण करण्यात आले याप्रसंगी बोलताना माऊली हरित अभियानाचे प्रमुख डॉ .सचिन पुणेकर म्हणाले की वृक्ष संजीवनी परिवाराने गेल्या चार वर्षापासून वृक्षारोपण केले आहे त्यांच्या कामाची दखल घेऊन, माऊली हरित व बायोस्फियर संस्था यांच्या वतीने पारितोषिक देत आहोत तसेच गेली दहा वर्षे पालखीतील वारकऱ्यांची चरण सेवा करणाऱ्या जय इन्स्टिट्यूट ऑफ नरसिंह प्रमुख लताताई नायकुडे आणि त्यांच्या 300 पेक्षा अधिक मुलींनी सेवा केली, संस्थेच्या वतीने त्यांचाही नागरी सन्मान करण्यात आला आहे, दत्तात्रय गायकवाड आणि शैलेंद्र पटेल यांचीही भाषणे झाली .
या कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम मंदिर येथील मंदिरामधून सदर रोपांची पालखीमध्ये बैठक करून दिंडी काढण्यात आली, याप्रसंगी बोलताना प्रा . कृष्णा ताटे यांनी प्रास्ताविकामध्ये सर्वांचे स्वागत करून इंदापूर मध्ये वृक्ष संजीवनी परिवाराने केलेल्या कार्यामुळे इंदापूर हे पर्यावरण पूरक बनत असून नांदुरक अजानवृक्ष सुवर्ण पिंपळ या वृक्षामुळे आळंदीतील ज्ञानेश्वर माऊली येथील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अंश इंदापूर मध्ये उतरला असून भविष्य काळामध्ये इंदापूरकर नागरिकांनी या वृक्षांना प्रदक्षणा करीत असताना त्यांना देहू आळंदी पंढरपूर येथे दर्शन घेत असल्याची अनुभुती येईल
या कार्यक्रमात हमीदभाई आत्तार, ॲड , आनंद केकान, प्रशांत सिताप, चंद्रकांत देवकर, संतोष जामदार, भारत बोराटे, अशोक ननवरे, सफल घासकाटू , रामेश्वर साठे, प्रशांत गिड्डे, रविंद्र परबत, शरद झोळ डॉ सुदिप ओहोळ,किसन पवार, देवराम मते, असलम शेख, ज्ञानदेव शिंदे, सुहास जौंजाळ, बोंगाणे सर नामवंत कीर्तनकार संतोष मगर,ओंकार जौंजाळ, शेषांदर बोबडे , मीनीनाथ कुंभार, दिनेश गायकवाड, माजी नगराध्यक्षा अलकाताई ताटे, लताताई नायकुडे, प्रा .जयश्री सरवदे, स्वाती अधटराव, लता नागपुरे, रोहीणी जौंजाळ, वर्षा गाढवे, मीना वेदपाठक श्यामल घासकाटू सहभागी झाले होते.आशी माहीती हमीदभाई आत्तार यांनी दिली.
टिप्पण्या