टेंभूर्णी:- वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते.वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते.
महालक्ष्मी गारमेंट्स चे मालक महादेव शेठ जमदाडे यांच्या तर्फे सालाबादप्रमाणे हा उपक्रम राबवण्यात आला
त्यांचे सर्व सहकारी व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैभव भैय्या महाडिक, अक्षय भाऊ ढवळे पै. आप्पा महाडिक, विठ्ठल महाडिक (चेअरमन) गोकुळ तात्या कोकरे, किशोर कडाळे, हनुमंत जमदाडे, महावीर (आबा) महाडिक तसेच जमदाडे व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
टिप्पण्या