चोरीला गेलेला ऐवज परत मिळेलच याची शाश्वती नसते ,मात्र अशक्य अशी कामगिरी नातेपुते (ता. माळशिरस) पोलिसांनी करून दाखवली आहे. यावेळी पोलिसांनी चोरीस गेलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून १० लाख ८० हजारांचा मुद्देमाल तक्रारदारांच्या स्वाधीन केल्याने तक्रारदारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.
काही महिन्यांपूर्वी नातेपुते पोलीस ठाण्यामध्ये चोरीच्या वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या होत्या .याबाबत नातेपुते पोलिसांनी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसेच नारायण शिरगावकर आदी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणा राबवून वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने मिळून १०,८०,८००/-रुपयांचा मुद्देमाल तक्रारदार व मूळ मालकास परत केला आहे.
यावेळी रोख रक्कम १,५०,००० तसेच १५ ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा लक्ष्मी हार व १७ ग्रॅम आणि १९.५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन यांसह ९.८० ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याचे बदाम तसेच २० ग्रॅम व २०.६१० ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन व ७ ग्रॅम वजनाचे गळ्यातील गंठण तसेच ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी यांसह २.२५ ग्रॅम वजनाचे गळ्यातील मंगळसूत्र असे वेगवेगळ्या गुन्ह्यातील एकूण १०,८०,८००/- किमतीचा ऐवज तक्रारदारांना परत करण्यात आला आहे.
यावेळी तक्रारदारांनी व परिसरातील नागरिकांनी नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत दिघे तसेच पोलीस हवालदार राकेश लोहार जावेद जमादार सुभाष गोरे महादेव कदम राहुल रुपनवर विकास बाबर असलम शेख सोमनाथ मोहिते अमोल देशमुख यांचे आभार मानले.
टिप्पण्या