मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वारकऱ्यांवर होमिओपॅथिक औषधोपचार काळाची गरज : मा.भरतशेठ शहा

इंदापूर, डॉ. संदेश शहा. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघ, आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान, समाजभूषण शरदकुमार माणिकचंद शहा ट्रस्ट तसेच सकल जैन समाजाच्या वतीने इंदापूर येथील सुश्रुत हॉस्पिटल मध्ये आयोजित मोफत होमिओपॅथिक शिबीराचा लाभ १२१ वारकरी रुग्णांनी घेतला. उपक्रमाचे हे बत्तीसावे वर्ष आहे.  मोफत होमिओपॅथिक औषधोपचार शिबीराचे उद्घाटन कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी केले. यावेळी भरत शहा म्हणाले, सध्या आधुनिक चिकित्सा, भारतीय आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध, युनानी औषधोपचार पद्धतीस जनमान्यता आहे. मात्र पालखी वारकऱ्यांना फक्त आधुनिक चिकित्सा पद्धतीव्दारे उपचार करण्यात येतात. काहींना त्याचे दुष्परिणाम जाणवतात. त्यामुळे त्यांच्यावर सुरक्षित उपचार करण्यासाठी होमिओपॅथिक उपाययोजना पालखी सोहळ्यात करणे गरजेचे आहे.  यावेळी बाळासाहेब मोरे, पोपटराव पवार, शकील सय्यद, प्रमोद राऊत, आरशाद सय्यद, सुनील तळेकर, अशोक चव्हाण, श्री. माने हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. संदेश शहा, डॉ...

कामठवाडीच्या विहिरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील कामठवाडी ( ता. पुरंदर) येथील करंज नाल्याजवळील एका विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला .मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (दि.३० जून) रोजी सुरज दशरथ दुर्गाडे (रा. कामठवाडी) हे नेहमी प्रमाणे सकाळी आपल्या शेताकडे फेरफटका मारायला गेले असता त्यांना करंज नाला शेजारील अंकुश दुर्गाडे यांच्या शेतातील ( गट क्र.५८७४) पाणी पुरवठ्याच्या विहिरी जवळ कुबट व दुर्गंधीचा उग्र वास आला .अशावेळी त्यांनी विहिरीत डोकावले असता त्यांना एका अनोळखी इसमाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना निदर्शनास आला.या घटनेची तात्काळ खबर त्यांनी वाल्हे पोलीस चौकीला दिली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करून मयताचा पंचनामा केला असता मयत इसमाची उंची साडे पाच फूट रंग निमगोरा शरीरावर क्रीम कलरचा शर्ट काळ्या रंगाची विजार काळपट बनियान गळ्यात व कमरेला काळा करगोटा उजव्या हाताला लाल रंगाचा धागा तसेच करंगळी शेजारील बोटात धातूची अंगठी आढळून आली आहे. या घटनेचा...

*इंदापूरच्या आश्रमशाळेत पालखी सोहळा उत्साहात*

*इंदापूर : पंढरीच्या वारीची परंपरा ही आपली वारकरी संस्कृती आहे. यातून सामाजिक ऐक्य, सर्व धर्म समभाव ही विचारधारा विद्यार्थ्यांमध्ये रुजावी या उद्देशाने मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात शालेय पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  या वेळी शालेय वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. यात विद्यार्थी विविध संतांच्या,वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले.विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई आदी संतांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले होते.विठ्ठल–विठ्ठल, ज्ञानोबा- माऊलीच्या गजरात विद्यार्थ्यांनी पालखीचा आनंद अनुभवला.  शिक्षक हिरालाल चंदनशिवे, नानासाहेब सानप यांनी वारी, दिंडीच्या परंपरेचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे(काकी),सचिव ॲड. समीर मख...

हर्षवर्धन पाटील यांच्या घराण्याला वारकरी संप्रदायाची अनेक पिढ्यांपासूनची मोठी परंपरा गेली 29 वर्षांपासून पायी चालत सोहळ्यात सहभागी

 इंदापूर जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे निमगाव केतकी येथून रविवारी (दि.29) सकाळी पायी चालत सहभागी झाले.            बावडा येथील हर्षवर्धन पाटील यांच्या घराण्याला वारकरी संप्रदायाची अनेक पिढ्यांपासूनची मोठी परंपरा आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे गेली 29 वर्षांपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये पायी चालत सहभागी होत आहेत.       पंढरीचा विठ्ठल हे साऱ्या विश्वाचे दैवत आहे, वारकरी परंपरा हे महाराष्ट्राचे वैभव आहे, पालखी सोहळ्यामध्ये पायी चालल्याने मिळणारा आनंद हा शब्दात व्यक्त करता येत नाही, त्यामुळे प्रत्येक वर्षी मी पालखी सोहळ्यामध्ये पायी चालत सहभागी होत असतो. पालखी सोहळे व वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे भूषण आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. देहूचे संत तुकाराम महाराजांचे वंशज मोरे घराणे व बावड्याचे हर्षवर्धन पाटील यांचे घराणे यांचे अनेक शतकांपासून ऋणानुबंध आहेत. बावडा येथे रत्...

श्री.संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील इंदापूर येथे वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी

इंदापूर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील इंदापूर येथे वारकऱ्यांची केली मोफत आरोग्य तपासणी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी चालत असलेल्या वारकऱ्यांकरिता महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांतदादा पाटील व श्री राजेशजी पांडे समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून तसेच श्री सचिनआबा पवार यांच्या समर्थ सोशल फाउंडेशन यांच्या आयोजनातुन इंदापूर येथे सुमारे 370 वारकऱ्यांची निशुल्क आरोग्य तपासणी आज करण्यात आली. यामध्ये रक्तातील शुगर, बी पी, तपासून रिपोर्ट देण्यात आले. तसेच दातांची तपासणी व दात साफ करून गरज असेल तर सिमेंट भरून देण्यात आले तसेच डोळ्यांची मोतीबिंदू, काचबिंदू तपासणी करून नंबरचे चस्मे देण्यात आले. अशा विविध तपासण्या करण्यात आल्या यावेळी या आरोग्य शिबिराचे उदघाटन देहू संस्थाचे अध्यक्ष जगतगुरू श्री तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह भ प श्री पुरषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला वसईविरारचे उपजिल्हा अधिकारी  शेखर घाडगे, पुणे शहर भाजप उपाध्यक्ष सुनील पांडे,इंदापूर वारकरी संप्रदायीचे खुशाल कोकाटे,डॉ संजय शिंदे, ...

स्वर्गीय कै.मारुती सोनवणे (पाटील ) मित्र परिवाराच्या वतीने शेकडो विठ्ठल भक्तांसाठी अन्नदान

इंदापूर: जगदरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी* सोहळ्याचा एक दिवस मुक्काम होता. त्यानिमित्ताने इंदापूर नगरी दुमदमून निघाली. संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूरात दाखल होताच स्वर्गीय* *कै.मारूती सोनवणे (पाटिल ) मित्र परिवार आणि इंदापुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष व इंदापूर नगरपरिषदेचे मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे परिवाराच्या वतीने शेकडो वारकरी व विठ्ठल भक्तांसाठी जेवणाची उत्तम सोय केली होती. तरी हजारो वारकरी भक्तानीं*   *जेवणाचा आस्वाद घेतला.* *यावेळी सोमनाथ सोनवणे, सतिश सोनवणे, सौ. विजयाताई खंडाळे,उज्वला आरडे. यांनी विषेश सहकार्य केले.तसेच विलास सोनवणे,ज्ञानेश्वर सोनवणे, विकास सोनवणे, सागर सोनवणे,समिर सोनवणे, दिग्विजय सोनवणे, सनी सोनवणे,मिलन सोनवणे,अजय सोनवणे, रवी सोनवणे, सुमित आरडे, दिपक सोनवणे,सोमनाथ खंडांळे, सुरज खंडाळे, किरण खंडाळे,अक्षय कुचेकर,चाँद खंडाळे,अभिषेक कुचेकर,उत्तम कुचेकर, किशोर ढावरे, यांनी परिश्रम घेतले.बाळासाहेब आडसुळ, राजु शिंदे, मुकिंद(आप्पा ) शिंदे,बंडू साठे,सोहम सोनवणे,आप्पा किशोर ढावरे,सोमना...

वडगाव निंबाळकर येथे हिंदू मुस्लिम सौहार्दाचे दर्शन

वाल्हे प्रतिनिधी- सिकंदर नदाफ श्री संतश्रेष्ठ सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत तसेच सोहळ्यातील वैष्णव भक्तांना अल्पोपहाराचे वाटप करून वडगाव निंबाळकर ( ता. बारामती ) येथील मुस्लिम समाजाने हिंदू -मुस्लिम सौहार्दाचे दर्शन घडविले आहे.  यावेळी मुस्लिम जमात वडगाव निंबाळकर यांच्या वतीने संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करून पालखी सोहळ्याचे विश्वस्त डॉ. त्रिगुण गोसावी यांचा देखील सत्कार करण्यात आला .यावेळी सत्काराला प्रत्युत्तर देताना त्रिगुण गोसावी म्हणाले वारकरी संप्रदायात जात धर्म वर्ण प्रांत भाषा अशा भेदजनक गोष्टींना कुठेही स्थान नाही. त्यामुळे पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक सेवाभावी हात राबत असतात. अशाच धर्तीवर येथील मुस्लिम समाजाने देखील वारकरी संप्रदायाची मनोभावे सेवा तसेच वैष्णव भक्तांना अल्पोपहाराचे वाटप करून समाजापुढे आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.   यावेळी वडगाव निंबाळकर मुस्लिम समाजाचे अध्यक्ष असिफ शेख उपाध्यक्ष जहांगीर शेख सचिव इकबाल शेख खजिनदार रिजवान पठाण स्पर्धा परीक्षा युवा मंचाचे संस्थापक शेख सर तसेच ...

राजर्षी शाहू पुरस्कार-2025 लेखक श्री. महादेव चव्हाण सर यांना प्रदान

इंदापूर:- राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त दिनांक 25/6/2025 रोजी युग प्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित राजर्षी शाहू पुरस्कार-2025 लेखक श्री. महादेव चव्हाण सर आपण केलेल्या लेखनातून सामाजिक शैक्षणिक राजकीय मार्गदर्शन मिळाले त्यामुळे आपल्या उत्तम साहित्याबद्दल आपणाला पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके देवमय--कवितासंग्रह , माझ्या शाळेच्या आठवणी--आत्मचरित्र,  ईर्षा--ग्रामीण लेखसंग्रह , आगामी प्रकाशन रानभेरी--ग्रामीण कादंबरी, जावे त्यांच्या गावा --प्रवास वर्णन संघर्ष योद्धा--मनोगत अशा विविध पुस्तकांचे लेखन केले आहे. इंदापूरच्या इतिहासाला उजाळा देण्याचे काम लेखणीतून केले आहे. सहज सोप्या ग्रामीण भाषेतून लेखन लेखकाने केले आहे. दिनांक 25/6/2025 रोजी लोकनेते शंकरराव पाटील सभागृह पंचायत समिती इंदापूर येथे उत्तम साहित्याबद्दलचा पुरस्कार प्रधान करताना व्याख्याते मा . यशवंत गोसावी पुणे, यांच्या शुभहस्ते सन्मान पुरस्कार देताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. विठ्ठल आप्पा ननवरे, संघर्ष समितीचे प्रमुख प्रा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोंन्नर यांचे हरिनाम कीर्तन

 इंदापूर;- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ज्येष्ठ पत्रकार ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोंन्नर यांचे हरिनाम कीर्तन  तसेच दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन या ९० किमी अंतराच्या जागतिक दर्जाच्या स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल श्री संतोष वाघचौरे, श्री गोपीनाथ मोरे, श्री जाधव संदीप यांचा नागरी सत्कार समारंभ होणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.आशी माहीती प्रा.कृष्णाजी ताटे यांनी दिली. या वेळी हमीदभाई आत्तार, महादेव चव्हाण सर सह इतर मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 27 जून 2025 रोजी सायंकाळी सात वाजता श्रीराम मंदिर रामवेस येथे होणार असून कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन  इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे

*इंदापूरच्या आश्रमशाळेत लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी*

इंदापूरच्या भिमाई आश्रमशाळेत राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा  करण्यात आला. यावेळी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर या शिक्षण संस्थेच्या अंकित असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते माऊली नाचण यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार, तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस व दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणं झाली. प्रा. जावेद शेख यांनी भाषणातून शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला. माऊली नाचण यांनी शाहू महाराजांवर स्वतः लिहिलेली कविता उपस्थितांसमोर सादर केली.यावेळी संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे, संच...

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त इंदापूर नगरपरिषद प्रशासनामार्फत पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी

  इंदापूर शहरात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्‍या पालखीचे रविवार,२९ जून रोजी आगमन होणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त इंदापूर नगरपरिषद प्रशासनामार्फत पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून उत्तम अशा प्रकारे  पूर्वनियोजन करण्यात आले आहे.                पालखी मार्गातील व शहरातील रस्त्यातील खड्डे बुजवणे,पालखी मार्ग तसेच शहरातील सर्व रस्ते यांची स्वच्छता करणे ,सर्व सार्वजनिक शौचालये यांची दुरुस्ती तसेच स्वच्छता करणे ,पालखी मार्गावरील सर्व अतिक्रमणे काढून घेणे ,पालखी मार्गावरील राडारोडा ,अस्ताव्यस्त पडलेले बांधकाम साहित्य काढून घेणे यासारखी कामे करण्यात येत आहेत.शहरात १३ सार्वजनिक शौचालये असून पालखी कालावधीसाठी निर्मलवारी अंतर्गत  अतिरीक्त‍ १२०० मोबाईल टॉयलेट उपलब्ध  करण्यात आले आहेत.शहरातील रिंगण सोहळा ते पालखी मुक्कामाचे ठिकाण, परतीचा मार्ग व शहरातील सर्व ठिकाणचे रस्ते,सर्व सार्वजनिक शौचालये,मोबाईल टॉयलेट दिवे दुरुस्त करून चालू  करण्यात आले आहेत.        ...

वाल्हेत शरदचंद्र पवार गटाकडून वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन

वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ  महर्षी वाल्मीकी ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हे नगरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पायी वारी करणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची अप्रतिम व्यवस्था करण्यात आल्याने वाल्हेकर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी तर्फे वाल्हे नजीक सुकलवाडी फाट्यावर भव्य महाप्रसाद छत्राची उभारणी करण्यात आली होती. यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना महाप्रसाद म्हणून चपाती भाजी फोडणीचा भात व बदामाचा शिरा पोटभर देण्यात आला. त्यामुळे वारकरी संप्रदायात देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या दरम्यान राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्य प्रमुख ह.भ. प. विठ्ठल( आबा) मोरे म्हणाले माऊलींचा पालखी सोहळा महाराष्ट्रातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी भक्तियोग असतो.त्यामुळे पंढरीच्या वाटेवर पाऊल टाकणाऱ्या वारकऱ्यांना सकस ताजे पौष्टीक भोजन देण्यासाठी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच पदाधिकारी मनोभावे प्रयत्न करत आहोत. या प्रसंगी अवधूत खाडे राम कोळपकर सुरेश पंडित ...

खेळाडूंच्या पाठीमागे राज्यशासन खंबीरपणे उभे- क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे

क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत ऑलिम्पिक दिनानिमित्त पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन पुणे, दि. २३: आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्यातील विविध खेळाडूंनी पदके मिळविली असून त्यांचे स्मरण करुन, आदर्श डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंनी कामगिरी करावी; खेळाडू, संघटनांना येणाऱ्या अडअडचणी सोडविण्यासोबतच त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच खेळाडूंच्या पाठीमागे राज्यशासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.  क्रीडा व युवक कल्याण संचालनालय आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिक दिनानिमित्त सर परशुराम महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली- उगले, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जाेशी, सुहास पाटील, विभागीय उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील गायकवाड, महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे, उपाध्यक्ष प्रदीप गंधे, महासचिव नामदेव शिरग...

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पुढाकाराने “इंडिया-ब्राझिल शुगर ॲंड बायो एनर्जी मिशन” अभ्यास दौरा - हर्षवर्धन पाटील

इंदापूर:- राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पुढाकाराने आपण “इंडिया-ब्राझिल शुगर ॲंड बायो एनर्जी मिशन” हा अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे. जगातील सर्वाधिक उत्कृष्ट व नियोजनबद्ध ऊस उत्पादन करणारा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझील येथे हा अभ्यास दौरा असून. या दौऱ्याचा उद्देश ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून साखर व सहउत्पादनांच्या माध्यमातून उद्योगास उभारी देणे, तसेच नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस उत्पादकांना अधिक समृद्ध बनविणे हा आहे.आसे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले,     CANE COUNTRY या नावानेही ब्राझील ओळखला जातो. जागतिक ऊस लागवडी खालील क्षेत्रामध्ये ३३ टक्के, तर ऊस उत्पादनात ४० टक्के एवढा विक्रमी वाटा असणारा हा जगातील प्रथम क्रमांकाचा देश.       ब्राझीलमध्ये सुपीक जमिनी, अनुकूल हवामान व पर्जन्यमान, विस्तीर्ण क्षेत्रामुळे शेतीचे यांत्रिकीकरण, किमान सहा खोडवे, यांत्रिकी तोडीमुळे पाचटाचे आच्छादन, सुधारित ऊस जाती अशा सर्वच गुणवैशिष्ट्यांमुळे इतर देशांच्या तुलनेत येथील ऊ...

*जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा*

पुणे, दि. १९: जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गजानन पाटील यांच्या हस्ते इनामदार वाड्यात श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्या हस्ते पादुकांचे पाद्य पूजन करून आरती झाली. यावेळी पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, पोलीस उपायुक्त बापू बांगर, देहू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव मोरे, ह.भ.प दिलीप मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश मोरे, ह.भ.प. लक्ष्मण मोरे आदी उपस्थित होते. दर्शन व पूजेनंतर मान्यवरांचा मंदिर संस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. महापुजेनंतर पालखीचे इनामदार वाड्यातून प्रस्थान झाले. देहू नगरीत सकाळपासूनच पावसाचा जोर होता. वारकऱ्यांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता. टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी.... 'ग्यानबा तुकाराम', 'माऊली, माऊली' चा गजर.... डोक्यावर...

निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला- भरतशेठ शहा मा.उपनगराध्यक्ष इंदापूर

इंदापूर दि. 18 :- ज्येष्ठ साहित्यिक, पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण, सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला आहे, अशा शब्दांत मा.उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांनी त्यांना शब्दात  श्रद्धांजली अर्पण केली.  मा.उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा म्हणतात की, मारुती चितमपल्ली सरांनी आपले संपूर्ण आयुष्य वन, प्राणी, पक्षी आणि निसर्गाच्या गूढ अभ्यासासाठी समर्पित केले. वृक्ष, पाने, फुलं, पक्षी, प्राणी, डोंगर, अशा निसर्गातील अनेक गोष्टींची माहिती असलेला विश्वकोश ही त्यांची ओळख होती. त्यांच्या लेखनातून मराठी साहित्यात निसर्गाविषयी संवेदनशील जाण निर्माण झाली. त्यांच्या लेखणीतून मराठी शब्दसंपदेत अनेक नवे शब्द, संकल्पना आणि अनुभवांची भर पडली आहे. वनविभागात तीन दशकांहून अधिक सेवा बजावत असताना त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिलं. त्यांच्या प्रयत्ना...

JBVP’S, विद्यानिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाला शासनाची मान्यता : लाखेवाडी, इंदापूर तालुक्यात प्रथमच AI & ML इंजिनिअरिंग शाखेस सुरुवात

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयस शासनाची मान्यता मिळाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी ची स्थापना सन्माननीय श्रीमंत ढोले सर यांनी केली. विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावसायिक संधी देखील उपलब्ध झाल्या पाहिजेत व ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षणाच्या सर्वोत्तम संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाची निर्मिती केली. शैक्षणिक वर्ष 2025- 26 मध्ये विद्यानिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयास All India Council For Technical Education ची मान्यता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, त्याचबरोबर तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांची मान्यता मिळाली असून चालू शैक्षणिक वर्षापासून (2025- 26) विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉज...

*प्रविण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न*

 इंदापूर सोनाई परिवाराचे संचालक, पुणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती, इंदापूर तालुक्यातील तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेले युवा नेतृत्व श्री प्रविण दशरथ माने यांचा मंगळवार दिनांक १७ जून रोजी वाढदिवस पार पडला. आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या युवा नेते प्रविण माने यांच्या वाढदिवसाची संपूर्ण तालुक्याभर चर्चा घडली. या चर्चेमागचे मूळ कारण म्हणजे तालुक्यातील गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय उपयोगी वस्तूंसाठीचा मदतीचा हात होय. प्रविण माने युवा मंचच्या माध्यमातून प्रविण माने यांच्या समर्थक व मित्रपरिवारांच्या वतीने माने यांची तुला करण्यात आली असून त्यांच्या वजना एवढे शालेय साहित्याचे तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांमध्ये वितरण करण्यात येणार आहे.  समाजहिताचा विचार करून सातत्याने आपल्या कृतीतून समाजासाठी धडपडणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा आशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने केलेला सन्मान व त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने देण्यात आलेल्या शुभेच्छा हे नक्कीच त्यांच्या कार्याचे एक प्रकारे कौतुकच करण्यात आले आहे असे म्हणणे वावगे ठ...

*जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन*

पुणे, दि. १८: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी आमदार सुनील शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते. दर्शनानंतर संस्थानच्यावतीने श्री.पवार यांचा सत्कार करण्यात आला.टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, 'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

वाणेवाडी येथे भारतीय पत्रकार संघाची मासिक सभा उत्साहात

प्रतिनिधी  - सिकंदर नदाफ संपूर्ण भारतात बहुचर्चित असलेल्या भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुक्याची मासिक सभा वाणेवाडी येथे उत्साही वातावरणात पार पडली. यावेळी सभेचे अध्यक्षस्थान पत्रकार संघाचे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे यांना भूषविण्यात आले होते.या सभेत त्यांनी नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना पत्रकार संघाच्या जवाबदारीची जाणीव करून दिली. तर पत्रकारांच्या कल्याणाहेतू विविध विषयांवर चर्चा करून पत्रकार संघाच्या वतीने आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येणार असल्याची माहिती बारामती तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मधुकर बनसोडे यांनी दिली .  याप्रसंगी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महंमद शेख सचिव शरद भगत सहसचिव माधव झगडे संघटक प्रमुख निखिल नाटकर माजी अध्यक्ष विनोद गोलांडे खजिनदार सोमनाथ लोणकर हल्लाकृती समिती प्रमुख अजय पिसाळ,प्रेस फोटो फोटोग्राफर जितेंद्र काकडे तसेच सोमनाथ जाधव यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

वाणेवाडी येथे भारतीय पत्रकार संघाची मासिक सभा उत्साहात

प्रतिनिधी  - सिकंदर नदाफ संपूर्ण भारतात बहुचर्चित असलेल्या भारतीय पत्रकार संघाच्या बारामती तालुक्याची मासिक सभा वाणेवाडी येथे उत्साही वातावरणात पार पडली. यावेळी सभेचे अध्यक्षस्थान पत्रकार संघाचे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे यांना भूषविण्यात आले होते.या सभेत त्यांनी नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना पत्रकार संघाच्या जवाबदारीची जाणीव करून दिली. तर पत्रकारांच्या कल्याणाहेतू विविध विषयांवर चर्चा करून पत्रकार संघाच्या वतीने आगामी काळात विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात येणार असल्याची माहिती बारामती तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मधुकर बनसोडे यांनी दिली .  याप्रसंगी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महंमद शेख सचिव शरद भगत सहसचिव माधव झगडे संघटक प्रमुख निखिल नाटकर माजी अध्यक्ष विनोद गोलांडे खजिनदार सोमनाथ लोणकर हल्लाकृती समिती प्रमुख अजय पिसाळ,प्रेस फोटो फोटोग्राफर जितेंद्र काकडे तसेच सोमनाथ जाधव यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

इंदापूर येथे एस बी पाटील इंटरनॅशनल व पब्लिक स्कूलच्या बेसबॉलच्या राष्ट्रीय विजेत्या संघाची मिरवणूक-एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलमध्ये खेळाडूंचा सत्कार

इंदापूर : प्रतिनिधी                    वनगळी-इंदापूर येथील शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस बी पाटील इंटरनॅशनल व पब्लिक स्कूलच्या अकरा वर्षाखालील मुलांच्या संघाने बंगलोर येथे शनिवारी (दि.14) झालेल्या मेजर बेसबॉल लीग कप क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय विजेतेपद मिळविले आहे. या विजयी संघाच्या खेळाडूंचे बेंगलोर येथून इंदापूर शहरात आगमन होताच रथातून भव्य मिरवणूक सोमवारी (दि.16) काढण्यात आली. त्यानंतर वनगळी येथे एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलमध्येही जल्लोषात रथातून मिरवणूक काढून खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.        बेसबॉल हा आंतरराष्ट्रीय खेळ असून, अमेरिकेसह तो जगभर आता महत्वाचा प्रमुख खेळ समजला जात आहे. एस बी पाटीलच्या संघाने बेसबॉलच्या अंतिम फेरीच्या सामन्यात मुंबई ब्रेव संघावर विजय प्राप्त करीत एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलचे नाव देशभर पोहचविले आहे. या संघामध्ये सार्थक माने, सार्थक रोकडे, अभिनव घाडगे, इंद्रनील घोगरे, रेयंश आगलावे, प्रज्वल शेटे, श्रीवर्धन ढुके, विराज भोंग, स्वराज भोंग, यशराज मारकड, रोह...

*साखरे वस्ती शाळेच्या प्रांगणात रंगले नवागतांचे स्वागत*

इंदापूर:- प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व मुलांचे औक्षण करून सौ अनिताताई खरात यांनी नवगतांचे स्वागत केले . तसेच मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्या. श्री काकासाहेब जाधव यांनी केले. यावेळी अनिताताई खरात म्हणाल्या की जिल्हा परिषद शाळा या सध्या अतिशय उत्कृष्ट मूल घडवत आहेत आणि पालकांनी आपली मुलं जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळेत पाठवावीत तसेच प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील पालकांनी आपली शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष द्यावे शिक्षकांनीही काही अडचण आली तरी आम्हाला केव्हाही सांगावे आम्ही त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करू परंतु मुलांच्या शिक्षणात कोणती हि काटकसर नको आज सर्वात जास्त अधिकारी जिल्हा परिषद शाळेत शिकून आलेले आहेत. जे अधिकारी बाहेर जिल्हा परिषद शाळेतून शिकून गेले त्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा कडे लक्ष द्यावे त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत कारण ...

वाल्हेच्या वाल्मीकी शाळेत शैक्षणिक साहित्यांचे वाटप

वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ वाल्हे(ता.पुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मीकी विद्यालयामध्ये यावर्षी नवागतांचे स्वागत पारंपारिक पद्धतीने करून त्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात  आले.  यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांनी विद्यालयामध्ये प्रवेश करणाऱ्या विध्यार्थ्यांची आकर्षक सजविलेल्या घोड्यावर बसवून मिरवणूक काढली. त्यांनतर भाजप ओबीसी सेल चे प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते यांसह सरपंच अतुल गायकवाड तसेच गिरीष पवार अमोल खवले यांच्या हस्ते प्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी गीतांजली मोरे शैला गवारी प्रियंका कणेरे या महिला शिक्षकांनी औक्षवण करुन विद्यार्थ्यांचे स्वागत देखील केले. या अनोख्या स्वागताने मुलांचे चेहरे खुलल्याचे दिसुन आले. याप्रसंगी उपसरपंच सम्राज्ञी लंबाते पर्यवेक्षिका नाझनीन अत्तार महर्षी वाल्मीकी वारकरी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अशोक महाराज पवार तसेच सागर भुजबळ तेजस दुर्गाडे, सचिन जाधव संदिप पवार विनोद पवार, कविता पवार वविनय शहा सागर दुर्गाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्...