यावेळी मुस्लिम जमात वडगाव निंबाळकर यांच्या वतीने संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करून पालखी सोहळ्याचे विश्वस्त डॉ. त्रिगुण गोसावी यांचा देखील सत्कार करण्यात आला .यावेळी सत्काराला प्रत्युत्तर देताना त्रिगुण गोसावी म्हणाले वारकरी संप्रदायात जात धर्म वर्ण प्रांत भाषा अशा भेदजनक गोष्टींना कुठेही स्थान नाही. त्यामुळे पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक सेवाभावी हात राबत असतात. अशाच धर्तीवर येथील मुस्लिम समाजाने देखील वारकरी संप्रदायाची मनोभावे सेवा तसेच वैष्णव भक्तांना अल्पोपहाराचे वाटप करून समाजापुढे आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी वडगाव निंबाळकर मुस्लिम समाजाचे अध्यक्ष असिफ शेख उपाध्यक्ष जहांगीर शेख सचिव इकबाल शेख खजिनदार रिजवान पठाण स्पर्धा परीक्षा युवा मंचाचे संस्थापक शेख सर तसेच टिपू भालदार फिरोज भालदार सलमान आत्तार जावेद बागवान इकबाल आत्तार शहीद बागवान फरदीन बागवान इरफान बागवान सोहेल भालदार चांद बागवान साद बागवान यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या