मुख्य सामग्रीवर वगळा

इंदापूर येथे एस बी पाटील इंटरनॅशनल व पब्लिक स्कूलच्या बेसबॉलच्या राष्ट्रीय विजेत्या संघाची मिरवणूक-एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलमध्ये खेळाडूंचा सत्कार

इंदापूर : प्रतिनिधी 
                  वनगळी-इंदापूर येथील शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित एस बी पाटील इंटरनॅशनल व पब्लिक स्कूलच्या अकरा वर्षाखालील मुलांच्या संघाने बंगलोर येथे शनिवारी (दि.14) झालेल्या मेजर बेसबॉल लीग कप क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय विजेतेपद मिळविले आहे. या विजयी संघाच्या खेळाडूंचे बेंगलोर येथून इंदापूर शहरात आगमन होताच रथातून भव्य मिरवणूक सोमवारी (दि.16) काढण्यात आली. त्यानंतर वनगळी येथे एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलमध्येही जल्लोषात रथातून मिरवणूक काढून खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. 
      बेसबॉल हा आंतरराष्ट्रीय खेळ असून, अमेरिकेसह तो जगभर आता महत्वाचा प्रमुख खेळ समजला जात आहे. एस बी पाटीलच्या संघाने बेसबॉलच्या अंतिम फेरीच्या सामन्यात मुंबई ब्रेव संघावर विजय प्राप्त करीत एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलचे नाव देशभर पोहचविले आहे. या संघामध्ये सार्थक माने, सार्थक रोकडे, अभिनव घाडगे, इंद्रनील घोगरे, रेयंश आगलावे, प्रज्वल शेटे, श्रीवर्धन ढुके, विराज भोंग, स्वराज भोंग, यशराज मारकड, रोहन देवकाते, सुशांत कोळेकर या विद्यार्थी खेळाडूंचा समावेश आहे. तर त्यांना क्रीडाशिक्षक साहिल बागवान, सचिन फुले, राहुल धोतरे, सौरभ बोराटे यांचे मार्गदर्शन लाभले.
   या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्द्ल संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा अंकिता ठाकरे पाटील, विश्वस्त राजवर्धन पाटील यांनी विजयी खेळाडूंचे व प्रशिक्षिकांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, बेंगलोरहून आगमनप्रसंगी विजयी खेळाडु व प्रशिक्षकांची सोमवारी (दि.16) इंदापूर येथील कला विज्ञान वाणिज्य कॉलेज ते बाजार समिती प्रवेशद्वारापर्यंत रथातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये खेळाडूंचे कुटुंबीयही सहभागी झाले होते.
•चौकट:-
एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलमध्ये जल्लोषात रथातून मिरवणूक!
---------------------------------------
या विजेत्या संघाची एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलमध्ये सोमवारी दि.16 रथातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात संस्थेचे सीईओ संतोष देवकर, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.एस. टी. श्रीखंडे, नॅशनल स्कूलचे प्राचार्य शैलेश दरेकर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रदीप बोडके यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी दूरध्वनीवरून खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
•चौकट:-
एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलला दर्जेदार शिक्षणासाठी पसंती!
----------------------------------------
बेसबॉल च्या विजेतेपदामुळे एस बी पाटील ग्रुप ऑफ स्कूलचे नाव आता देशपातळीवर पोहोचले आहे. वनगळी-इंदापूर येथे पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेज, इंटरनॅशनल स्कूल, डिप्लोमा, अभियांत्रिकी, फार्मसी कॉलेजच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. गुणत्तेसाठी व प्लेसमेंटसाठी एस बी पाटील चे नाव शिक्षण क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जात आहे. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा अंकिता ठाकरे पाटील, विश्वस्त राजवर्धन पाटील यांचे नियोजनाखाली आगामी काळात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषद बोलताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. देवकर यांनी नमूद केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते

नीरा-भीमा कारखान्यावरती संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व कारखान्याची स्थापनेपासूनची सलग 5 वी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध -सर्व 21 जागा बिनविरोध

इंदापूर :प्रतिनिधी दि.13/3/2025                         शहाजीनगर(ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 ते 2030-31 या कालावधीच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग 5 व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या 25 वर्षात सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि.13) सर्व 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.           माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी सन 1999 मध्ये नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत.          नीरा-भीमा कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत गेल्या 25 वर्षांमध्ये शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केलेला आहे . तसेच सध्...