इंदापूर, डॉ. संदेश शहा.अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघ, आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान, समाजभूषण शरदकुमार माणिकचंद शहा ट्रस्ट तसेच सकल जैन समाजाच्या वतीने इंदापूर येथील सुश्रुत हॉस्पिटल मध्ये आयोजित मोफत होमिओपॅथिक शिबीराचा लाभ १२१ वारकरी रुग्णांनी घेतला. उपक्रमाचे हे बत्तीसावे वर्ष आहे.
मोफत होमिओपॅथिक औषधोपचार शिबीराचे उद्घाटन कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी केले.
यावेळी भरत शहा म्हणाले, सध्या आधुनिक चिकित्सा, भारतीय आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध, युनानी औषधोपचार पद्धतीस जनमान्यता आहे. मात्र पालखी वारकऱ्यांना फक्त आधुनिक चिकित्सा पद्धतीव्दारे उपचार करण्यात येतात. काहींना त्याचे दुष्परिणाम जाणवतात. त्यामुळे त्यांच्यावर सुरक्षित उपचार करण्यासाठी होमिओपॅथिक उपाययोजना पालखी सोहळ्यात करणे गरजेचे आहे.
यावेळी बाळासाहेब मोरे, पोपटराव पवार, शकील सय्यद, प्रमोद राऊत, आरशाद सय्यद, सुनील तळेकर, अशोक चव्हाण, श्री. माने हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. संदेश शहा, डॉ. राधिका शहा, डॉ. श्राविका शहा यांनी
ताप, सर्दी, दमा, मणक्याचे विकार, गुडघेदुखी, थायरॉईड, सोरायसिस, मूतखडे, पित्ताशयाचे खडे, मासिक पाळीतील तक्रारी, विविध जखमा आदी आजारावर वारकऱ्यांची तपासणी करून त्यांना एक महिन्यांच्या गोळ्या दिल्या. यावेळी जालना, नांदेड, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य तुषार रंजनकर, डॉ. भास्कर गटकुळ, जमीर शेख, सुभाष पानसरे, आदिक इंगळे, धरमचंद लोढा, पत्रकार संघाचे जिल्हा निरीक्षक
शौकत तांबोळी, जिल्हा संघटक शैलेश काटे,
काकासाहेब मांढरे, राजेंद्र कवडे देशमुख, सुरेश जकाते, कैलास पवार, जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब जामदार तालुकाध्यक्ष संतोष आटोळे, सोशल मिडिया तालुकाध्यक्ष धनंजय कळमकर पाटील, तालुका सचिव संदीप बल्लाळ, रामवर्मा आसबे, नाशेरा मुलाणी यांनी प्रयत्न केले.
टिप्पण्या