इंदापूर:- राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त दिनांक 25/6/2025 रोजी युग प्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित राजर्षी शाहू पुरस्कार-2025 लेखक श्री. महादेव चव्हाण सर आपण केलेल्या लेखनातून सामाजिक शैक्षणिक राजकीय मार्गदर्शन मिळाले त्यामुळे आपल्या उत्तम साहित्याबद्दल आपणाला पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके देवमय--कवितासंग्रह , माझ्या शाळेच्या आठवणी--आत्मचरित्र,
ईर्षा--ग्रामीण लेखसंग्रह , आगामी प्रकाशन रानभेरी--ग्रामीण कादंबरी, जावे त्यांच्या गावा --प्रवास वर्णन संघर्ष योद्धा--मनोगत अशा विविध पुस्तकांचे लेखन केले आहे. इंदापूरच्या इतिहासाला उजाळा देण्याचे काम लेखणीतून केले आहे. सहज सोप्या ग्रामीण भाषेतून लेखन लेखकाने केले आहे. दिनांक 25/6/2025 रोजी लोकनेते शंकरराव पाटील सभागृह पंचायत समिती इंदापूर येथे उत्तम साहित्याबद्दलचा पुरस्कार प्रधान करताना व्याख्याते मा . यशवंत गोसावी पुणे, यांच्या शुभहस्ते सन्मान पुरस्कार देताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. विठ्ठल आप्पा ननवरे, संघर्ष समितीचे प्रमुख प्रा. कृष्णा ताटे, मा. नगरसेवक अशोक मखरे, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार, हमीदभाई आत्तार .युग प्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष श्री उत्तम गायकवाड सचिव श्री सुहास शेवाळे कार्याध्यक्ष श्री अमोल खराडे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यांच्या प्रेरणेतून हा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
टिप्पण्या