संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त इंदापूर नगरपरिषद प्रशासनामार्फत पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी
इंदापूर शहरात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवार,२९ जून रोजी आगमन होणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त इंदापूर नगरपरिषद प्रशासनामार्फत पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी केली असून उत्तम अशा प्रकारे पूर्वनियोजन करण्यात आले आहे.
पालखी मार्गातील व शहरातील रस्त्यातील खड्डे बुजवणे,पालखी मार्ग तसेच शहरातील सर्व रस्ते यांची स्वच्छता करणे ,सर्व सार्वजनिक शौचालये यांची दुरुस्ती तसेच स्वच्छता करणे ,पालखी मार्गावरील सर्व अतिक्रमणे काढून घेणे ,पालखी मार्गावरील राडारोडा ,अस्ताव्यस्त पडलेले बांधकाम साहित्य काढून घेणे यासारखी कामे करण्यात येत आहेत.शहरात १३ सार्वजनिक शौचालये असून पालखी कालावधीसाठी निर्मलवारी अंतर्गत अतिरीक्त १२०० मोबाईल टॉयलेट उपलब्ध करण्यात आले आहेत.शहरातील रिंगण सोहळा ते पालखी मुक्कामाचे ठिकाण, परतीचा मार्ग व शहरातील सर्व ठिकाणचे रस्ते,सर्व सार्वजनिक शौचालये,मोबाईल टॉयलेट दिवे दुरुस्त करून चालू करण्यात आले आहेत.
पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पाणीपुरवठाचे नियोजन करण्यात आले असून जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेमार्फत पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. पालखी कालावधीसाठी नगरपरिषदेकडून १० पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय करण्यात येणार आहे.पालखी तळावर महिलासाठी तात्पुरत्या स्वरुपात ५० क्षमतेचे स्वतंत्र स्नानगृह उभारण्यात आले आहेत.
रयत शिक्षण संस्थेच्या सौ, कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय,इंदापूर यांचे प्रांगणात गोल रिंगण आखणेत आले आहे.रिंगण सोहळ्याचे ठिकाणी पालखी ठेवण्याकरिता मंडप व स्टेजची उभारणी करणेत येत आहे.रिंगणाचे बॅरिकेटिंग करणेत आले आहे.पालखी तळावर सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून येणाऱ्या भाविकांना रिंगण सोहळा पाहता यावा म्हणून डिजिटल स्क्रीन ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
नगरपरिषदकडे १ अग्निशमन वाहन असून पालखी सोहळ्यासोबत सदर वहन २४ तास राहणार असून त्यावर प्रशिक्षित कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नगरपरिषदेमार्फत पालखी आगमनापासून प्रस्थानापर्यंत पालखी सोहळयातील वारक-यांच्या सेवा/सुविधासाठी नगरपरिषदने 24 तास दक्षता घेणेसाठी १० संवर्ग अधिका-यांची व ८० नगरपरिषद कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. आशी माहीती मुख्याधिकारी,
*इंदापूर नगरपरिषद, इंदापूर यांनी दिली
*
टिप्पण्या