इंदापूरच्या भिमाई आश्रमशाळेत राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा
करण्यात आला. यावेळी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर या शिक्षण संस्थेच्या अंकित असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक,
उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे आणि मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते माऊली नाचण यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार, तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीस व दिवंगत रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणं झाली. प्रा. जावेद शेख यांनी भाषणातून शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला. माऊली नाचण यांनी शाहू महाराजांवर स्वतः लिहिलेली कविता उपस्थितांसमोर सादर केली.यावेळी संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे, संचालक गोरख तिकोटे, विद्यार्थी,शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हिरालाल चंदनशिवे यांनी सूत्रसंचालन केले.
टिप्पण्या