वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ महर्षी वाल्मीकी ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हे नगरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पायी वारी करणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची अप्रतिम व्यवस्था करण्यात आल्याने वाल्हेकर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडी तर्फे वाल्हे नजीक सुकलवाडी फाट्यावर भव्य महाप्रसाद छत्राची उभारणी करण्यात आली होती. यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना महाप्रसाद म्हणून चपाती भाजी फोडणीचा भात व बदामाचा शिरा पोटभर देण्यात आला. त्यामुळे वारकरी संप्रदायात देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
या दरम्यान राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्य प्रमुख ह.भ. प. विठ्ठल( आबा) मोरे म्हणाले माऊलींचा पालखी सोहळा महाराष्ट्रातून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी भक्तियोग असतो.त्यामुळे पंढरीच्या वाटेवर पाऊल टाकणाऱ्या वारकऱ्यांना सकस ताजे पौष्टीक भोजन देण्यासाठी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वच पदाधिकारी मनोभावे प्रयत्न करत आहोत.
या प्रसंगी अवधूत खाडे राम कोळपकर सुरेश पंडित श्रीकांत महामुनी देविका मोरे सुकलवाडीचे जेष्ठ नेते शिवाजीराव पवार यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या