वाल्हे प्रतिनिधी-सिकंदर नदाफ वाल्हे(ता.पुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मीकी विद्यालयामध्ये यावर्षी नवागतांचे स्वागत पारंपारिक पद्धतीने करून त्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात
आले. 
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांनी विद्यालयामध्ये प्रवेश करणाऱ्या विध्यार्थ्यांची आकर्षक सजविलेल्या घोड्यावर बसवून मिरवणूक काढली. त्यांनतर भाजप ओबीसी सेल चे प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते यांसह सरपंच अतुल गायकवाड तसेच गिरीष पवार अमोल खवले यांच्या हस्ते प्रवेशित विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी गीतांजली मोरे शैला गवारी प्रियंका कणेरे या महिला शिक्षकांनी औक्षवण करुन विद्यार्थ्यांचे स्वागत देखील केले. या अनोख्या स्वागताने मुलांचे चेहरे खुलल्याचे दिसुन आले. याप्रसंगी उपसरपंच सम्राज्ञी लंबाते पर्यवेक्षिका नाझनीन अत्तार महर्षी वाल्मीकी वारकरी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अशोक महाराज पवार तसेच सागर भुजबळ तेजस दुर्गाडे, सचिन जाधव संदिप पवार विनोद पवार, कविता पवार वविनय शहा सागर दुर्गाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कर्यक्रमाचे संयोजन अनिल दुर्गाडे लक्ष्मण भालसिंग दत्तात्रय टिळेकर सतिश अधिकारी संदिप जाधव संतोष जगदाळे सुनिल ढवळे निता कांबळे मोहन गावडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर कुदळे आदींनी केले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सतिश निगडे यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब घोडके यांनी सुत्रसंचालन तर संजय निर्मळ यांनी आभार मानले.
टिप्पण्या