इंदापूर
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील इंदापूर येथे वारकऱ्यांची केली मोफत आरोग्य तपासणी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी चालत असलेल्या वारकऱ्यांकरिता महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांतदादा पाटील व श्री राजेशजी पांडे समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून तसेच श्री सचिनआबा पवार यांच्या समर्थ सोशल फाउंडेशन यांच्या आयोजनातुन इंदापूर येथे सुमारे 370 वारकऱ्यांची निशुल्क आरोग्य तपासणी आज करण्यात आली. यामध्ये रक्तातील शुगर, बी पी, तपासून रिपोर्ट देण्यात आले. तसेच दातांची तपासणी व दात साफ करून गरज असेल तर सिमेंट भरून देण्यात आले तसेच डोळ्यांची मोतीबिंदू, काचबिंदू तपासणी करून नंबरचे चस्मे देण्यात आले. अशा विविध तपासण्या करण्यात आल्या यावेळी या आरोग्य शिबिराचे उदघाटन देहू संस्थाचे अध्यक्ष जगतगुरू श्री तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज ह भ प श्री पुरषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला वसईविरारचे उपजिल्हा अधिकारी शेखर घाडगे, पुणे शहर भाजप उपाध्यक्ष सुनील पांडे,इंदापूर वारकरी संप्रदायीचे खुशाल कोकाटे,डॉ संजय शिंदे, प्रा शरद झोळ,कृषि अधिकारी सुधीर आवचर,सावता माळी संस्थानचे सुधीर माळी सर, माढा कृषी विभागचे शरद पवार,गिरीश भिसे, गोरख शिंदे,सचिन महाजन, प्रसाद गारटकर इ मान्यवर उपस्थित होते तसेच या शिबीराला पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रवीणभैय्या माने, तसेच समर्थ युवा फाउंडेशनच्या सौ सरोज पांडे यांनी यावेळी शिबीराला भेट दिली.
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या