राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पुढाकाराने “इंडिया-ब्राझिल शुगर ॲंड बायो एनर्जी मिशन” अभ्यास दौरा - हर्षवर्धन पाटील
इंदापूर:- राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या पुढाकाराने आपण “इंडिया-ब्राझिल शुगर ॲंड बायो एनर्जी मिशन” हा अभ्यास दौरा आयोजित केलेला आहे. जगातील सर्वाधिक उत्कृष्ट व नियोजनबद्ध ऊस उत्पादन करणारा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्राझील येथे हा अभ्यास दौरा असून. या दौऱ्याचा उद्देश ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून साखर व सहउत्पादनांच्या माध्यमातून उद्योगास उभारी देणे, तसेच नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस उत्पादकांना अधिक समृद्ध बनविणे हा आहे.आसे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले,
CANE COUNTRY या नावानेही ब्राझील ओळखला जातो. जागतिक ऊस लागवडी खालील क्षेत्रामध्ये ३३ टक्के, तर ऊस उत्पादनात ४० टक्के एवढा विक्रमी वाटा असणारा हा जगातील प्रथम क्रमांकाचा देश.
ब्राझीलमध्ये सुपीक जमिनी, अनुकूल हवामान व पर्जन्यमान, विस्तीर्ण क्षेत्रामुळे शेतीचे यांत्रिकीकरण, किमान सहा खोडवे, यांत्रिकी तोडीमुळे पाचटाचे आच्छादन, सुधारित ऊस जाती अशा सर्वच गुणवैशिष्ट्यांमुळे इतर देशांच्या तुलनेत येथील ऊस उत्पादन खर्च कमी आहे.
उसाची वाढ जोमाने व्हावी यासाठी साखर व इथेनॉल उत्पादनाच्या प्रक्रियेदरम्यान बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचा वापर केला जातो.आसे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
**************************************
टिप्पण्या