मुख्य सामग्रीवर वगळा

JBVP’S, विद्यानिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाला शासनाची मान्यता : लाखेवाडी, इंदापूर तालुक्यात प्रथमच AI & ML इंजिनिअरिंग शाखेस सुरुवात

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयस शासनाची मान्यता मिळाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जय भवानीगड विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी ची स्थापना सन्माननीय श्रीमंत ढोले सर यांनी केली. विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावसायिक संधी देखील उपलब्ध झाल्या पाहिजेत व ग्रामीण भागामध्ये उच्च शिक्षणाच्या सर्वोत्तम संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाची निर्मिती केली. शैक्षणिक वर्ष 2025- 26 मध्ये विद्यानिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयास All India Council For Technical Education ची मान्यता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, त्याचबरोबर तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांची मान्यता मिळाली असून चालू शैक्षणिक वर्षापासून (2025- 26) विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लाखेवाडी मध्ये चार विविध कोर्सेस सुरू होत असून ए आय अँड एम एल (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग), सिव्हिल इंजिनिअरिंग, इ एन टी सी(इलेक्ट्रॉनिक अँड टेलेकम्युनिकेशन), कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या शाखेतील प्रत्येक शाखेमध्ये साठ विद्यार्थी क्षमतेस शासनाची मान्यता मिळालेली आहे. 
ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षणाच्या माध्यमातून देशातील व देशाबाहेरील विविध नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणारा असून या कॉलेजमुळे अनेक विद्यार्थी पालकांचे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्याचे स्वप्न साकार होणार असून स्वतःची व आपल्या पालकांची स्वप्न पूर्ण करण्याची संधी या माध्यमातून मिळणारा आहे. श्रीमंत ढोले सर यांनी कॉलेज निर्मिती पाठीमागचा उद्देश हा विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये मोठ्या शहरात मिळणाऱ्या सर्व भौतिक सुविधा लाखेवाडी मध्ये उपलब्ध करून देऊन तज्ञ प्राध्यापकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल व या पुढील काळात देखील प्रत्येक वर्षी नवीन अभ्यासक्रम संस्थेत सुरू करण्याचा मानस बोलून दाखवला. तसेच इंदापूर तालुक्यातील लाखेवाडीला नवीन शैक्षणिक हब बनवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच ट्रेनिंग व भविष्यातील नोकरीच्या संधीसाठी विविध आंतरराष्ट्रीय व व्यावसायिक कंपनी बरोबर सामंजस्य करार झाले आहेत. तसेच संस्थेत काम करणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व आपण केलेल्या प्रयत्नामुळेच संस्थेला विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्याचे बळ मिळत आहे.
यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ चित्रलेखा ढोले, संस्थेचे मुख्य सल्लागार प्रदीपजी गुरव, संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे, संस्थेच्या सहसचिवा पौर्णिमा खाडे, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज ढोले, ऋषीकेश ढोले व प्राचार्य डॉ सम्राट खेडकर, गणेश पवार, राजेंद्र सरगर, सर्व विश्वस्त, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते

नीरा-भीमा कारखान्यावरती संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व कारखान्याची स्थापनेपासूनची सलग 5 वी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध -सर्व 21 जागा बिनविरोध

इंदापूर :प्रतिनिधी दि.13/3/2025                         शहाजीनगर(ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 ते 2030-31 या कालावधीच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सलग 5 व्या पंचवार्षिक निवडणुकीत कायम राहिले आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या 25 वर्षात सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (दि.13) सर्व 21 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.           माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी सन 1999 मध्ये नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका बिनविरोध होत आहेत.          नीरा-भीमा कारखान्याने स्थापनेपासून चांगले कामकाज करीत गेल्या 25 वर्षांमध्ये शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केलेला आहे . तसेच सध्...