इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या वतीने शाहीर अमर शेख सभागृहामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली 'परीक्षेस सामोरे जाताना ' या कार्यक्रमाचे तसेच इयत्ता 11वी विद्यार्थ्याकडून इयत्ता 12वी विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील यांनी परीक्षेत विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन करावे असे मत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांना त्यांनी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे निरीक्षक प्रा. मदन हराळ पाटील म्हणाले की,' विद्यार्थ्यांनी अंतर्मुख होऊन परीक्षेत तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी जिगरबाज असे कार्य पार पाडावे. कार्यकर्तृत्वान व्यक्तींचा इतिहास व त्यांचे शौर्य , कार्य लक्षात घेतल्यास त्या विचाराने प्रभावित होऊन आपण यशसिद्धी मिळवावी. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे म्हणाले क...
SHIVSRUSTHI NEWS