इंदापूर महाराष्ट्र राज्य कला संचालनालय मुंबई यांचे मार्फत घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल 99.30 टक्के लागला. दहा जानेवारी 2025 रोजी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व 13 जानेवारी 2025 रोजी एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. श्री. नारायणदास रामदास हायस्कूल मधून दोन्ही परीक्षेसाठी एकूण 142 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी 141 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एलिमेंटरी परीक्षेसाठी 79 विद्यार्थी सहभागी होते. त्यापैकी 78 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेसाठी 63 विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
A ग्रेड 8 विद्यार्थी ,B ग्रेड 22 विद्यार्थी तर उरलेले 111 विद्यार्थी हे सी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या कला शिक्षिका श्रीमती शिर्के व्ही .एस. यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा श्री हर्षवर्धनजी पाटील साहेब व प्राचार्य श्री.संजय सोरटे यांनी यांनी अभिनंदन केले.
टिप्पण्या