इंदापूर, ता. ३० - इंदापूर येथील शंकरराव पाटील चँरिटेबल ट्रस्ट , इंदापूर मध्ये पहिल्या मराठी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या १ आणि २ फेब्रुवारीला हे संमेलन होत आहे. ट्रस्टच्या वतीने गेली अनेक वर्षे या परिसरात ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी कोपीवरची शाळा,
ओजस बाल संस्कार केंद्र, आरोग्यविषयक उपक्रम राबवविले जातात. ट्रस्टचे खजिनदार तुषार रंजनकर व सहकाऱ्यांच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी
प्रयत्नशील असतात. त्यांच्या संकल्पनेतून यावेळी तालुक्यातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी या बालसाहित्य संमेलनचे आयोजन करण्यात आले आहे.
ख्यातनाम साहित्यिक राजीव तांबे संमेलनाचे अध्यक्ष असून साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर जाधवर उदघाटक आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते
डॉ. संगीता बर्वे, संजय वाघ, पुस्तकविश्वचे संस्थापक नवनाथ जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. संमेलनात विद्यार्थ्यांसाठी नृत्य, क्रीडा
आणि वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रस्टच्या अध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, विश्वस्त अरविंद गारटकर यांचे गरजू
आणि वंचित घटकासाठी कामाला नेहमीच प्रोत्साहन असते. या संकल्पनेलाही त्यांनी बळ दिले, असे श्री. रंजनकर यांनी सांगितले.
टिप्पण्या