इंदापूर मकर संक्रांतीच्या निमित्ताने प्रा.भास्कर ईश्वर गटकुळ यांच्या निवासस्थानी माजी आमदार श्री.दत्तात्रय अच्युतराव सावंत, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार यांनी सदिच्छा भेट देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागात शैक्षणिक विकास, नवीन शैक्षणिक धोरण बाबत चर्चासत्र आयोजन, शिक्षकांच्या अडचणी या संदर्भात शासन दरबारी प्रश्न सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करू असे आश्वासन मा. दत्तात्रय अच्युतराव सावंत यांनी दिले. जिजाऊ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा प्रा.जयश्री गटकुळ, जिजाऊ ब्रिगेड इंदापूर तालुकाध्यक्ष सौ.कल्पना भोर, पतंजली योगपीठ इंदापूरचे विलास गाढवे, आडेगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक बंडू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या