इंदापूर, डॉ. संदेश शहा.यांचे कडून इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील गलांडवाडी नंबर १ व नरुटवाडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत ऊस तोड करणाऱ्या ऊस तोडणी मजुरांचे थंडी पासून रक्षण व्हावे म्हणून त्यांना इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूल इयत्ता दहावी बॅच सन २००५-०६ मधील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी ब्लँकेट वाटप केले तसेच ऊस तोडणी मजुरांच्या मुलांचे थंडी पासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांना कानटोपी वाटप करण्यात आले. ऊस तोडणी सुरू असलेल्या शेतात जावून विद्यार्थ्यांनी ब्लँकेट व कान टोपी वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली. १८ वर्षां नंतर झालेल्या गेट -टुगेदर मधून या विद्यार्थ्यांनी शाळेस घड्याळ तसेच सॅनिटरी नॅपकीन मशीन दिले होते. त्यातून राहिलेल्या पैशातून योग्य गरजूंना मदत मिळावी म्हणून गरज ओळखून ब्लॅंकेट व लहान बालकांना कानटोपी वाटप करण्यात आले. यावेळी वर्गातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी ऊस तोडणी मजुरांना आपल्या मुलांना त्यांच्या आवडी प्रमाणे शिक्षण देण्याचे आवाहन केले. या
समयोचीत उपक्रमाचे ऊस तोडणी मजुरांनी हार्दिक स्वागत केले. या अभिनव उपक्रमाचे इंदापूरकरांनी कौतुक केले.
टिप्पण्या