जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 09/जानेवारी,2025,10/जानेवारी2025,11 जानेवारी2025 अशा सलग तीन दिवसीय मल्हार महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा,पुस्तकी ज्ञानाबरोबर सुसंस्कार ही मिळायला हवेत म्हणून प्रशालेमध्ये श्रीकृष्ण थीम मल्हार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते नटराज मूर्तीचे पूजन व श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन तिन्ही दिवस करण्यात आले.
स्नेहसंमेलन म्हणजेच मुलांना घडवण्याची संधी आहे.स्नेहसंमेलन हा कार्यक्रम केवळ मनोरंजन म्हणून नाही तर एक संस्कार करण्याची संधी आहे म्हणूनच प्रशालेमध्ये अशा संस्कार महोत्सवाचेच आयोजन करण्यात आले.
भारतात संस्कृती विकासाच्या सर्व अडथळ्यावर मात करत वेगवेगळ्या जाती-जमातींना एकत्र आणण्याचे काम नृत्य आणि संगीताने केले आहे. नृत्य हे फक्त कलावंतासाठीच नसते प्रत्येक व्यक्ती हा जन्मजात नट, नर्तकी असतोच.
नृत्य आनंद व्यक्त करण्याचे महत्त्वाचे साधन आहे, नृत्य हा पूर्वपार भक्ती भावाचाच भाग आहे. डोळ्याच्या हालचाली, चेहऱ्यावरचे हावभाव,मुद्रा यातून होणारी भावनांची अभिव्यक्ती म्हणजेच नृत्य होय. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्याचे नेत्रदीपक असे सादरीकरण प्रशालेतील विद्यार्थ्यांनी केले.
त्यामध्ये भरतनाट्यम, कथकली, कोळीगीत, रास, लेझीम,ढोल नारदीचा नाच,राधा गौळण नाच, दांडिया, गरबा, इत्यादी प्रकारात विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.
मल्हार महोत्सव या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण थीमसह अनेक गाण्याचे सादरीकरण श्रीकृष्णावरील आधारित भक्ती गीते, गवळणी कोळीगीत, पोवाडा, गोंधळी गीत, शेतकरी गीत, देशभक्ती गीते, योगकला, अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिवराज्याभिषेक सोहळा, आधुनिक वाद्य संगीत, लोककला पोतराज गीते, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, महाभारत, गरबा, शिवतांडव अशा विविध प्रकारचे मनमोहक नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी अतिशय जोश पूर्ण व आनंदमयी वातावरणात सादर केले.
मल्हार महोत्सवाचे औचित्य साधून कार्यक्रम प्रसंगी प्रशालेतील गुणवत्त विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला तसेच क्रीडा महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा ही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
संस्थेच्या सहसचिव सौ. पौर्णिमा खाडे यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला.
संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.श्रीमंत ढोले यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले की, संस्था अत्याधुनिक सोयीसुविधा आणि दर्जेदार शिक्षण देण्याचे काम करीत आहे,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हेच उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून प्रशालेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात म्हणूनच प्रशालेतील सर्वसामान्य शेतकऱ्यांचाही विद्यार्थी आज राज्यातच नव्हे तर देश पातळीवर यशस्वी होताना दिसत आहे असे यशस्वी विद्यार्थ्यांबद्दल गौरव उद्गार काढले.
संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.चित्रलेखा ढोले यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले की, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ज्या शैक्षणिक संकुलाची निर्मिती केली त्या शैक्षणिक संकुलात मुलींच्या शिक्षणावर जास्तीत जास्त भर देण्यात आला आणि प्रशालेमधील मुलींची सुरक्षिततेची जास्तीत जास्त काळजी घेण्यात आली म्हणूनच आज प्रशालेमध्ये मुलींची संख्या जास्त आहे तसेच शिक्षण संस्थेला अनेक पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले आहे. आदर्श शैक्षणिक संस्था म्हणून आज नावलौकिक वाढत आहे.
कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यामध्ये मंत्री क्रीडा, युवक कल्याण अल्पसंख्यांक विभाग व औकाफ महाराष्ट्र राज्य मा.श्री. दत्तात्रय (मामा) भरणे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. दत्तात्रय भरणे मामा यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की, स्नेहसंमेलन कार्यक्रम बघितल्यानंतर शिक्षण संस्थेचा दर्जा काय आहे तो समजला. विद्यार्थ्यांना गुणवत्तेबरोबर कलागुणांना वाव देऊन सुसंस्कारक्षम घडवण्याचे काम संस्था करीत आहे.
प्रत्येक व्यक्तीने धकाधकीच्या जीवनात ताणतणाव बाजूला ठेवून जीवनाचा आनंद घ्या, हसत खेळत जीवन जगा, जीवन खूप सुंदर आहे. असा मोलाचा सल्ला दिला.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सर्वच विद्यार्थ्यांना व पालकांना अनमोल असे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कलाटणी देण्याचे काम संस्था करीत आहे. सर्वच दर्जेदार शैक्षणिक सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपले उज्वल भविष्य घडवावे, चांगला आदर्श गुणवंत विद्यार्थी घडावा, चांगले अधिकारी घडावेत, यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्न करावे,आपल्या पालकांच्या कष्टाचे चीज करावी. शिक्षणाबरोबर संस्काराही महत्त्वाचे आहेत, आई-वडिलांचा सन्मान करा, सगळ्या जगात श्रेष्ठ काय असेल तर तो तुमचा विचार आहे, तुमच्या आई-वडिलांना जे करता आले नाही ते तुम्ही करून दाखवावे. असे मान्यवरांनी अनमोल विचार विद्यार्थ्यांना व पालकांना दिले.
कार्यक्रमाला इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. सचिन खुडे, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. श्री. मधुकर भरणे, सिने अभिनेता मा. श्री. धनंजय जामदार, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती मा.श्री. सुदर्शन राठोड,
सहव्यवस्थापक संचालक सिडको महाराष्ट्र राज्य मा.श्री.दिलीप ढोले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा.श्री.प्रदीप गारटकर, अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई मनपा मा. सौ. सुजाता ढोले, विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मा. श्री. सुहास चौरे, मंत्री क्रीडा,युवक कल्याण अल्पसंख्यांक विभाग आणि औकाफ महाराष्ट्र राज्य मा.ना.श्री.दत्तात्रय (मामा) भरणे, सचिव पर्यावरण, वन पोर्ट व कृषी दादरा नगर हवेली व दमन दीव, भारत सरकार मा. श्री. सागर डोईफोडे,सहाय्यक वनसंरक्षक
मा. श्री. विक्रांत खाडे, अध्यक्ष
जय भवानीगड प्रतिष्ठान तथा मा .सदस्य जि. प.पुणे मा. श्री. श्रीमंत ढोले,उपाध्यक्षा
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान तथा लाखेवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच मा. सौ. चित्रलेखा ढोले, जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे मुख्य सल्लागार, माजी गटशिक्षणाधिकारी मा. श्री. प्रदीप गुरव, सचिव श्री. हर्षवर्धन खाडे, सहसचिव सौ. पौर्णिमा खाडे, संस्थेचे विश्वस्त चि.पृथ्वीराज ढोले, चि.ऋषिकेश ढोले, कु. अक्षता ढोले, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा.श्री. गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य मा. श्री. राजेंद्र सरगर, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. श्री. सम्राट खेडकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
टिप्पण्या