*जगाला मार्गदर्शक ठरेल अशी आदर्श राज्यघटना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली.- ॲड . मनोहर चौधरी*
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात 76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड. मनोहर चौधरी यांनी वरील मत व्यक्त केले.ॲड.मनोहर चौधरी यांच्या हस्ते यावेळी ध्वजवंदन करण्यात आले.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी उत्कृष्ट असे संचलन सादर केले.संविधान अमृत महोत्सवानिमित्त संविधान उद्देशिकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करून वाचन करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय छात्र सेनेतील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच अर्थशास्त्र विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या अर्थशास्त्रीय सामान्य ज्ञान स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मनोहर चौधरी म्हणाले की,' भारतातील सर्व भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक गोष्टी डोळ्यासमोर ठेवून ही घटना तयार केली आहे आज यामुळे भारताची सर्व क्षेत्रात प्रगती होत आहे. घटनेच्या माध्यमातून शांतता , कायदा व सुव्यवस्था राखली जात आहे .
प्रा. कृष्णा ताटे म्हणाले की,' भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी आदर्श राज्यघटना आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नेमली गेली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना तयार झाली. 26 जानेवारी 1950 पासून ही राज्यघटना अमलात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे म्हणाले की ,' स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी ज्यांनी मोठे बलिदान दिले आहे , त्याग केला आहे , योगदान दिले आहे त्या स्वातंत्र्यवीरांना , महामानवाच्या कार्यास मी महाविद्यालयाच्या वतीने त्रिवार अभिवादन करतो. संविधानाचे अमृत महोत्सव आपण साजरे करत आहोत. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारताला जगातील सर्वात मोठी राज्यघटना दिली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत, कार्य करीत आहेत. इंदापूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या दोन विद्यार्थ्यांची सलग दोन वर्ष दिल्ली येथे परेडसाठी निवड झाली आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी सर्वांना प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा दिल्या. इंदापूर महाविद्यालय सर्व क्षेत्रात प्रगती करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले.
राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी प्रा. दिनेश जगताप ,कला शाखा विभाग प्रमुख डॉ.भिमाजी भोर ,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सदाशिव उंबरदंड यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी केले. आभार प्रा. बापू घोगरे यांनी मानले.
टिप्पण्या