इंदापूर चेतना फाउंडेशन इंदापूर संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ विभागीय कार्यालय पुणे यांच्यामार्फत 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सर्व महाविद्यालयांमध्ये साजरा करण्यात यावा असे आव्हान केले होते त्याचाच एक भाग म्हणून चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी इंदापूर येथे विविध उपक्रमांद्वारे मराठी भाषेचे संवर्धन हा उपक्रम महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा मराठी फलक लेखन इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित देसाई हे अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग प्रा. चैतन्य महारनवर प्रा. सुरज माने यांनीही मराठी भाषेचे संवर्धन याबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच महाविद्यालयामधील पदवी आणि पदविका मधील विद्यार्थ्यांनी सुद्धा मनोगती व्यक्त केली. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. उदय देशपांडे सचिव मा. विलास भोसले खजिनदार मा.सोमनाथ माने यांचे विशेष सहकार्य लाभले तरी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक ग्रंथपाल विकास हुबाले सर प्राध्यापिका नम्रता मोरे यांनी काम पाहिले स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक चैतन्य महारनावर यांनी केली तर आभार वैष्णवी डोईफोडे यांनी केले.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या