*पुणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत इंदापूर नगरपरिषद संघाचा कबड्डी स्पर्धेत प्रथम, रस्सीखेच स्पर्धेत तृतीय क्रमांक*
राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करणेसाठी पोषक वातावरण निर्माण करणेसाठी क्रीडा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहीले राज्य आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावर अधिकारी / कर्मचारी यांच्याकरिता क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची शारीरिक तंदुरुस्ती व कार्यक्षमता वाढीस हातभार लागेल. नगरपरिषदा व नगरपंचायती मध्ये विविध खेळ प्रकारात वेगवेगळ्या स्तरावर प्राविण्यप्राप्त खेळाडू असल्याने क्रीडा स्पर्धा घेतल्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांमध्ये उत्साह येईल व त्याचा उपयोग कार्यक्षमता वाढीकरिता होईल, जेणेकरून अधिकारी व कर्मचारी यांचा कामाचा व मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल या उद्देशाने पहिल्यांदाच नगरविकास विभाग,नगरपरिषद प्रशासन संचालनालय,पुणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम 2024-25 चे आयोजन श्री.व्यंकटेश दुर्वास,जिल्हा सह आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली 9 जानेवारी ते 11 जानेवारी 2025 या कालावधीत बारामती शहरात करण्यात आले होते.
या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट,कबड्डी,रस्सीखेच व्हॉलीबॉल यांसारखे सांघिक खेळ तसेच धावणे,चालणे,गोळा फेक ,थाळी फेक,लांब उडी,उंच उडी, टेबल टेनिस ,बॅडमिंटन, कॅरम,बुद्धिबळ यासारख्या वैयक्तिक खेळांचे तसेच सांस्कृतिक खेळांचे आयोजन करण्यात आले.पुणे जिल्ह्यातील सर्व 17 नगरपरिषदा/नगरपंचायती मधील खेळाडू या विविध खेळांच्या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.यामधे इंदापूर नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांनी क्रिकेट,कबड्डी, रस्सीखेच या सांघिक खेळात तसेच विविध वैयक्तिक खेळात सहभाग नोंदविला होता.
तीन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्याधिकारी श्री.रमेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली इंदापूर नगरपरिषदेने *कबड्डी या खेळात प्रथम क्रमांक* तर *रस्सीखेच या खेळात तृतीय क्रमांक* पटकावला.तसेच धावणे,लांब उडी, बॅडमिंटन ,कॅरम,बुद्धिबळ यांसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारातदेखील कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. 400 मिटर रिले स्पर्धेत शिवदत्त भोसले, विवेकानंद बिराजदार, नितीन जगताप व राजू भानवसे यांनी 3रा क्रमांक, तर प्रसाद देशमुख यांनी 200मिटर धावणे स्पर्धेत व लांब उडी प्रकारात अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक तसेच टेबल टेनिस डबलेस मध्ये शिवदत्त भोसले व प्रसाद देशमुख यांनी 3रा क्रमांक पटकवला.या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री माननीय श्री.अजितदादा पवार यांच्या हस्ते 11 जानेवारी रोजी पार पडला.यावेळी श्री.दत्तात्रय लांघी,उपायुक्त विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, श्री.व्यंकटेश दुर्वास,जिल्हा सह आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय पुणे,तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या