*इंदापूर*: (दि.१४) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात वार्षिक स्नेहसंमेलनाचे सोमवारी (दि.१३) आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गोपीचंद गलांडे (माजी सरपंच, गलांडवाडी नं.२), संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे,पालक यांच्या हस्ते बहुजन महामाता, इंदापूरचे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या प्रतिमांचे पुजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार भिमाई परिवाराच्या वतीने करण्यात आला
या महोत्सवाची सुरुवात विद्यार्थ्यांनी पिंपळाच्या पानावर या गीताने केली. मराठंमोळी गीतं, हिंदी सिनेमातील गीतं,भीमगीते, पोतराज, रिमिक्स गीतं,लोकगीते, लावण्या, देशभक्तीपर गीते, मराठी नाटकं,छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीतं,आदिवासी नृत्य आदी कलाविष्कार सादर करत मायबाप रसिकांची मने जिंकली. पालकांसह उपस्थितीतांनी कलाविष्कार सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कौतुकाची थाप देत त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला.
याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे, सचिव ॲड, समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे,अस्मिता मखरे, संतोष मखरे,ॲड, सुजय मखरे, ॲड. अण्णासाहेब कडवळे, तेजस मखरे (प्रादेशिक परिवहन अधिकारी,बारामती), नानासाहेब चव्हाण, अक्षय मखरे, तेजस मखरे, आजी-माजी विद्यार्थी पालक वर्ग शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमास मुख्याध्यापक साहेबराव पवार,प्राचार्या अनिता साळवे यांच्यासह शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नानासाहेब सानप, हिरालाल चंदनशिवे यांनी केले.
टिप्पण्या