इंदापूर:नितीन क्षीरसागर यांच्या कडुन मौजे कालठण क्रमांक एक ता.इंदापुर येथील उत्कर्ष विद्यालयाचे ध्वजारोहण श्री तुकाराम जाधव यांनी केले.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रघुनाथ पन्हाळकर उपस्थित होते.
कालठण ग्रामपंचायत ध्वजारोहण ग्रामसेवक श्री दिपक बोरावके व प्राथमिक शाळा ध्वजारोहण मुख्याध्यापक
राजेंद्र जगताप यांनी केले.
दरम्यान विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीतून बेटी बचाव बेटी पढाओ
जय जवान जय किसान आदी स्वतंत्र्याचा नारा देत सामाजिक संदेश दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशासकीय समन्वयक राधीका कुलकर्णी होत्या . अध्यक्षीय भाषणातून म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा माध्यमातून वैचारिक वारसा पुढे चालवत न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या तत्त्वांचा पुरस्कार करायला हवा असे सांगितले.
उत्कर्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रघुनाथ पन्हाळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रजासत्ताकतक दिनाच्या निमित्ताने संविधान वाचन कवायत संस्कृतीक कार्यक्रम गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सत्कार आदी उपक्रम राबविले.
शैक्षणिक कार्याबद्दल मुख्याध्यापक श्री रघुनाथ पन्हाळकर सहशिक्षक हनुमंत जगताप यांचा शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.सामाजीक कार्याबद्दल सौ.सुशिला पवार यांचा सत्कार पोलिस पाटील पुनम जावळे व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार आजी माजी सैनिक यांनी केला. प्रजासत्ताक कार्यक्रमाचे वेळी ग्रामपंचायत आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी जन प्रबोधन केले.
उपस्थित यांची मने जिंकली.यावेळि राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी विद्यार्थ्यांना बक्षीस देत कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल वाघमोडे व रजनीकांत चव्हाण यांनी प्रयत्न केले.
प्रस्ताविक. रघुनाथ पन्हाळकर
सूत्रसंचालन . हनुमंत जगताप व कृष्णा शेंडे
आभार सुरेश गटकुळ यांनी मानले
टिप्पण्या